मिरज प्रतिनिधी नजीर शेख : ऑल इंडिया मजलीसे इत्तेहादुल मुस्लिमीन (ए आय एम आय एम) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी यांच्या आदेशानुसार, आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सय्यद इम्तियाज जलील यांच्या अध्यक्षतेखाली तसेच महाराष्ट्रचे कार्यतत्पर कार्याध्यक्ष गफ्फार कादरी यांच्या नेतृत्वाखाली कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण भारतासह महाराष्ट्रात लॉक डाऊन असताना महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी कडून एकदम तीन महिन्याचे वीज बील पाठविले , त्या सोबतच सदरचे वीजबिल वाढीव स्वरूपात पाठवून महाराष्ट्रातील गोर गरीब जनतेची पिळवणूक करण्याचे काम विद्युत वितरण कंपनीकडून चालले आहे त्याला विरोध करण्यासाठी ए आय एम आय एम पक्षाच्या वतीने लॉक डाऊन काळातील तीन महिन्याचे वीजबिल पूर्ण माफ करण्यासाठी येत्या २० जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे महाराष्ट्र शासनाविरोधात तीव्र असे आंदोलन करण्यात येणार आहे .
सर्व सामान्य जनतेने येत्या 20 तारखेच्या आंदोलनास पाठिंबा द्यावा असे आवाहन ए आय एम आय एम पक्षाचे सांगली जिल्ह्याचे नेते डॉ महेशकुमार कांबळे यांनी केले आहे.