Share Now
Read Time:1 Minute, 6 Second
सांगली/मिरज प्रतिनिधी नजीर शेख : नगरसेवक गणेश माळी व त्रिशूल मित्रमंडळ वतीने आज प्रभाग ७ मध्ये कोरोना जनजागृती मोहीम घेण्यात आली.
यामध्ये नागरिकांची आरोग्य तपासणी व रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी अर्सेनीक अल्बम ३० हे औषध मोफत देण्यात आले. तसेच प्रभागातील डॉक्टराना पीपीई कीट देण्यात आले.
यावेळी उपमहापौर आनंदा देवमाने, नगरसेवक गणेश माळी, डॉक्टर तुषार पीड्डे, भाजपा शहर अध्यक्ष बाबासाहेब आळतेकर, प्रविण खोबरे , उमेश माळी, सागर मगदूम, निरंजन देशपांडे, अविनाश खोबरे, अथर्व डबरे , अजिंक्य कत्तिरे, गुरुनाथ शेट्टी आणि त्रिशूल मंडळ व गणेश माळी मित्र मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Share Now