कोल्हापूर प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : गांधीनगर (ता. करवीर) परिसरातील पाच गावांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सतत वाढत असून बुधवारी ती दोनशेच्या टप्प्यात म्हणजे १९४ वर पोहोचली. दरम्यान चिंचवाडमधील एका डॉक्टरचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
गांधीनगरमध्ये बुधवारी तब्बल ९ रुग्णांची वाढ झाली. गडमुडशिंगीमध्ये दोन, तर वळीवडे व चिंचवाड येथे प्रत्येकी एक रुग्ण वाढला आहे.उचगावमध्ये आणखी दोन रुग्ण वाढले आहेत. हे रुग्ण समर्थ नगर व मणेर मळा येथील मोळे कॉलनीमध्ये आढळून आले. उचगाव व गांधीनगरमध्ये संसर्गाची साखळी वाढत असून रुग्णसंख्या वाढत आहे.
गांधीनगर बाजारपेठपैकी गडमुडशिंगी हद्दीतच कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. गडमुडशिंगी गावभागात मात्र कोरोनाचा रुग्ण अद्याप मिळालेला नाही.
गांधीनगर परिसरातील गाववार कोरोना रुग्णांची बुधवारअखेरची संख्या अशी :
गांधीनगर (८७), वळिवडे (५१), उचगाव (२९), चिंचवाड (६) आणि गडमुडशिंगी (११). याप्रमाणे गांधीनगर परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आज अखेर १९४ झाली आहे.
