अवैधरीत्या सुगंधी तंबाखू चा वाहतूक करणारा ट्रक पकडण्यात सांगली/ मिरज पोलिसांना यश

सांगली प्रतिनिधी संतोष कुरणे : सांगली पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा व सांगली अप्पर पोलिस अधीक्षक मनीषा डुबुले यांनी अवैध व्यवसायावर कारवाई करण्यासाठी आदेश दिले आहेत.

त्यानुसार उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप सिंग गिल मिरज यांना गुप्त बातमीदार यामार्फत मिळालेल्या माहितीनुसार मिरज ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील मिरज बेडग रोड वरील बेडग गावातील इंडियन ऑइल या पंपावर ट्रक नंबर आर जे १४ जी के ३८९८ हा संशयित रित्या मिळून आला.

Advertisements

  हा ट्रक ताब्यात घेऊन तपासला केला असता त्यामध्ये माणसाच्या जीवाला अपायकारक असणारी सुगंधी तंबाखू ( प्रभात टोबॅको रत्ना टोबॅको सिगरेट बॉक्स )असा एकूण १,२५,९०,४६४/- रुपये इतक्या किमतीचा मुद्देमाल मिळून आला.

 यामुळे ट्रक चालक मुकेश कुमार जगदीश सोळंकी वय ४० राहणार मथुरा (उत्तर प्रदेश) याच्यावर मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.

 या कारवाईमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप सिंह गिल मिरज , व कार्यालयाकडील स्टाफ पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील मिरज ग्रामीण पोलीस ठाणे, व स्टाफ सहभागी होता . या गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि समाधान बिले मिरज ग्रामीण पोलीस ठाणे हे करत आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *