Getting your Trinity Audio player ready...
|
सांगली/मिरज प्रतिनिधी नजीर शेख : कोरोना या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव वाढल्याने सांगली जिल्ह्यात २२ जुलै रोजीच्या रात्री १० वाजल्यापासून ते ३० जुलै अखेर लॉकडाऊन करण्यात जाहीर करण्यात आले .
या लॉकडाऊनमध्ये प्रशासनाने काय सुरू राहणार व काय बंद राहणार याबद्दल नियमावली बनवली आहे.
हे सुरु राहणार
माणसांचे आणि जनावरांचे दवाखाने, मेडिकल, बँका, एटीएम, रक्तपेढ्या दूध गॅस वर्तमानपत्रे वितरण, न्यायालये, कोविड योध्यांना सेवा देणारे हॉटेल, लॉज सुरू राहणार इ-कॉमर्स माध्यमातून वस्तू वितरण अाणि कुरिअर सेवा सुरु राहणार
ग्रामीण भागातील जनतेला जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी अाणि बाहेरून ग्रामीण भागात येण्यासाठी परवानगी
सर्व उद्योग सुरु राहणार, कामगारांचे परवाने उद्योग केंद्र अाणि पोलीस देणार
हे बंद राहणार
किराणा भाजीपाला सह सर्व दुकाने आणि बाजारपेठा बंद, हॉटेल, बार, वाईन शॉप,लॉज बंद राहणार. प्रार्थनास्थळे, मार्केट कमिटी़, कृषी सेवा केंद्रे, सलूनही बंद, शाळा कॉलेज क्रीडांगणे व्यायामशाळा, चित्रपटगृह बंद, एस टी वाहतूक बंद अाणि सर्व प्रकारची प्रवासी वाहतूक बंद
लग्न, मुंज, साखरपुडा वगैरे समारंभावर ही बंदी……