Share Now
Read Time:1 Minute, 7 Second
कोल्हापूर प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : संघटित व असंघटित महिला विभागाच्या गांधीनगर ब्लॉक काँग्रेसच्या अध्यक्षपदी हेमलता बबन माने यांची निवड झाली.
महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा ॲड. चारुलता टोकस यांच्या आदेशानुसार संघटित व असंघटित महिला विभाग काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा ॲड. मनीषा चंद्रकांत रोटे यांनी निवडीचे पत्र सौ. माने यांच्याकडे सुपूर्द केले.
गृहराज्यमंत्री सतेज पाटील व कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांनी या निवडीसाठी प्रयत्न केले.
श्री महालक्ष्मी वुमेन्स फाउंडेशनच्या माध्यमातून हेमलता माने यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन ही निवड करण्यात आली आहे.
Share Now