गणेश मूर्तीच्या उंचीबाबत शासनाने कोणतेही निर्बंध घालू नयेत : स्वरा फौंडेशन अध्यक्ष प्रमोद माजगावकर

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:3 Minute, 49 Second

कोल्हापूर दिनेश चोरगे : कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने मा.अमिताभ गुप्ता, प्रधान सचिव (विशेष),गृह विभाग यांनी सार्वजनिक गणेशोत्सव २०२० मार्गदर्शक सूचना संदर्भात दि.११ जुलै रोजी क्रमांक-आर एल पी – ६२०/प्र.क्र. ९० /विशा १ व नुसार परिपत्रक /आदेश पारित केले होते.

सार्वजनिक मंडळाची गणेश मुर्ती ४ फूट असावी , तर घरगुती गणेशमूर्ती २ फुटाच्या मर्यादित असावी, असा परिपत्रकात सूचना क्र.३ नुसार आदेश आहे.

यावर्षी २४ ऑगस्ट रोजी गणेश उत्सव साजरा होत असल्याने कुंभार समाजातील मूर्तिकारांनी गेल्या आठ ते दहा महिन्यापासून गणेशमूर्ती तयार करण्याचे काम सुरु केले होते.
डिसेंबर २०१९ पासून संपूर्ण महाराष्ट्रातील सार्वजनिक गणेश मंडळाकडून मिळालेल्या ऑर्डर नुसार कुंभार समाजातील मूर्तिकार व्यवसायिकांनी खाजगी व बँकेचे कर्ज काढून ४ फुटाबरोबर ४ फुटापेक्षा जास्त उंचीच्या गणेश मूर्ती तयार केलेल्या आहेत.

आधीपासूनच आर्थिक अडचणीत असलेला कुंभार समाज ११ जुलैला काढण्यात आलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव परिपत्रकातील नियमावली क्र.३ च्या आदेशामुळे हवालदिल झाला आहे . कारण कर्ज काढुन करोडो रुपयांच्या चार फुटांपेक्षा जास्त उंचीच्या बनवलेल्या गणेश मूर्तींची विक्री झाली नाही, तर कुंभार समाजातील कुटुंबावर आर्थिक संकट येऊन ते उद्ध्वस्त होतील तसेच कोविड-१९ मुळे आर्थिक संकटात सापडलेल्या कुंभार समाजावर भविष्यात उपासमारीची वेळही येऊ शकते. असे स्वरा फौंडेशन चे अध्यक्ष प्रमोद माजगावकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रकाद्वारे म्हंटले आहे.

त्याचप्रमाणे एखाद्या परिसरात कोविड-१९ झोन निर्माण झाल्यास कुंभार बांधवांना शासनाच्या नियमाप्रमाणे सोशल डिस्टन्स,मास्क,सॅनेटायझर चा वापर करून गणेश मूर्तीची विक्री करण्यास आणि लॉकडाऊन च्या काळात व्यापाऱ्याना राज्यातून दुसऱ्या राज्यात, जिल्हयातून दुसऱ्या जिल्ह्यात, शहरातून दुसऱ्या शहरात गणेश मूर्ती ची वाहतूक करण्यास परवानगी मिळावी, त्याचबरोबर कुंभार समाजाचा गणेश मूर्तीच्या व्यवसायावर वर्षाचा उदरनिर्वाह चालत असल्याने, गणेश मूर्तीच्या उंचीबाबत शासनाने कोणतेही निर्बंध घालू नये,  याचा सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा. असेही स्वरा फौंडेशनचे अध्यक्ष प्रमोद माजगावकर यांनी मुख्यमंत्र्यांना लिहलेल्या पत्रकात म्हंटले आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *