सांगली प्रतिनिधी शरद गाडे : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडवणीस यांच्या वाढदिवसानिमित्त सांगली येथील पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय येथे पेशंट, नातेवाईक व कर्मचारी तसेच वेलणकर अनाथाश्रम येथे सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या हस्ते फळवाटप करून देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
यावेळी महापौर गीताताई सुतार, उपमहापौर धीरज सूर्य -वंशी, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष दीपक माने, भाजपा युवा नेते अतुल माने, भाजपा सांगली पूर्व मंडल अध्यक्ष दरीबा बंडगर, भाजपा सांगली पश्चिम मंडल अध्यक्ष शीतल कर्वे, भाजपा सांगली मध्य मंडल अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, श्रीकांत वाघमोडे, अल्पसंख्यांक शहर अध्यक्ष गौस पठाण, राजू जाधव, भाजप युवा मोर्चाचे प्रथमेश वैद्य, अमित भोसले, राहुल माने, पिंटूभाऊ माने, अनिकेत खिलारे, अनिकेत बेळगावे, सोहम जोशी, शुभम माने, दिलीप माने आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.