Share Now
Read Time:1 Minute, 17 Second
सांगली प्रतिनिधी सतीश घाडगे : साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या मिरजेतील अधिकृत पुतळ्यास जयंतीनिमित्त रंगरंगोटी तसेच विद्युत रोषणाई करण्यात यावी, यासाठी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुतळा समिती मिरज यांच्या वतीने महानगरपालिकेस मागणी करण्यात आली होती.
म्हणून मनपाचे अधिकारी श्री कोरे यांच्या उपस्थितीत सदर पुतळ्याची पाहणी केली. व सदर पुतळ्याचे लवकरच काम सुरु करण्यात येईल, असे कोरे म्हणाले.
यावेळी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुतळा समिती मिरजचे अध्यक्ष भिमराव कृष्णा बेंगलोरे, बबन साठे, प्रशांत लोखंडे, गणेश वायदंडे, विद्याधर लोखंडे, शुभम कांबळे, आकाश चंदनशिवे, महादेव साठे, शंकर कांबळे, राहुल वायदंडे, निशांत वायदंडे, लखन धोंगडे, रोहित सकते, हे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Share Now