Share Now
कोल्हापूर प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : गांधीनगर सिंधी सेंट्रल पंचायतीचे अध्यक्ष भजनलाल हुंदलदास डेंबडा (वय ८२ ) यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण बाजारपेठेत शोककळा पसरली. त्यामुळे मंगळवारी दुपारपर्यंत बाजारपेठ बंद राहिली.
कोल्हापूर शहरसह गांधिनगर परिसरातील सिंधी समाजाच्या संघटनमध्ये त्यांचा वाटा होता. सिंधी सेंट्रल पंचायतीमध्ये बरीच वर्षे त्यांनी संचालक पद भूषवले. गांधीनगर परिसरातील विविध सामाजिक, शैक्षणिक संस्थांचे ते मार्गदर्शक होते. होलसेल व रिटेल व्यापारी वर्गाशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते होते. गांधिनगर बाजारपेठ रुजण्यासाठी व वाढण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. सिंधी समाजाच्या जडणघडणीमध्ये त्यांचे योगदान राहिले. त्यांच्यामागे तीन मुलगे, विवाहित मुलगी व नातवंडे असा परिवार आहे.
Share Now