गांधीनगरमध्ये अडीच लाखांचा गुटखा जप्त; दोघांना अटक

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:2 Minute, 2 Second

कोल्हापूर प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : गांधीनगर (ता. करवीर) येथील चिंचवाड रोडवरील कोकण सेवा ट्रान्सपोर्टच्या मागील बाजूच्या गाळ्यामध्ये गांधीनगर पोलीसानी छापा टाकून दोघांकडून २ लाख ५६ हजार ८५० रुपयांचा गुटका जप्त केला. 

  मुलचंद बाशूमल निरंकारी (वय ६१ , रा. शिरू चौक गांधीनगर) व मनीष लखीराम वधवा (वय २४, रा. कोयना कॉलनी, गांधीनगर) अशी दोघा अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबतची माहिती गुरुवारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी दिली.
गांधीनगर पोलिसांना पेट्रोलिंग करीत असताना ट्रान्सपोर्ट लाईनला गुटका आणून तो विक्री होत असल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाली.
त्यानुसार गुन्हे अन्वेषण पथकातील पोलीस कर्मचारी कोकण सेवा ट्रान्सपोर्टच्या मागील बाजूस गेले. तेथे असलेल्या गाळ्यात निरंकारी व वधवा या दोघा जणांसह गुटका मोठ्या प्रमाणात आढळून आला. अन्नसुरक्षा व मानद कायद्यानुसार गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून या दोघांना अटक केली.

त्यांच्याकडून २ लाख ५६ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या छापा टाकलेल्या पथकामध्ये पोलीस उपनिरीक्षक मलमे, हवालदार मोहन गवळी, आकाश पाटील, आयुब शेख, विराज डांगे, अशोक पवार, बालाजी हंगे व संजय कोल्हे यांचा समावेश होता.

 

 

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *