कोल्हापूर प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : शिवाजी बुवा यांची सहकुटुंब कारसेवा १९८६ च्या अयोध्येच्या संदर्भातील निकालानंंतर श्रीराम मंदिराचे कुलूप काढण्यात आले .खऱ्या अर्थाने येथूनच श्रीराम मंदिर निर्माणाचे आंदोलन विश्व हिंदु परिषदेने सुरु केले. यात शिये (ता.करवीर)येथील शिवाजी बुवा यांनी सक्रिय सहभाग घेतला.
प्रतिकूल परिस्थितीत गावोगावी जनजागरण मोहीम राबवून केवळ सव्वा रुपया लोकवर्गणी व एक वीट याप्रमाणे शिये येथे वीटा गोळा केल्या.एकत्रित केलेल्या वीटा अयोध्येला पाठवण्यासाठी कै.वेदशास्त्रसंपन्न जेरे शास्त्री यांच्या हस्ते विधिवत पूजा करुन त्या विटा अयोध्येला पाठवल्या.
सन १९९० ला अयोध्येला कारसेवेसाठी १५० लोक गेले होते.शिये येथील शिवाजी बुवा यांनी सहकुटुंब कारसेवा बजावली होती शिवाजी बुवा यांच्यासह त्यांची पत्नी सुवर्णा बुवा ,बंधू विलास बुवा, वहिनी सुनिता बुवा ,जयसिंगपूरचे बळवंत चौगले व शारदा चौगले यांचा समावेश होता .
पोलिसांनी रेल्वे आडवून कारसेवकांना ताब्यात घेतले.पण ही तीन जोडपी व एक सहकारी अशा सात जणांनी आम्ही तीर्थयात्रेला चाललो आहोत , म्हणून खोटे सांगितल्याने रेल्वेतून त्यांना पुढचा प्रवास करता आला . यानंतर पुढे भितीदायक, गंभीरपरिस्थीतीमुळे सात जणांनी मध्येच रेल्वेतून उतरूनआडमार्गाने पायपीट केली.या चित्तथरारक प्रसंगाची माहिती शिवाजी बुवा यांनी दिली.
१९९२ च्या कारसेवेत शिवाजी बुवा आपल्या सहा महिन्याचा शरयू नावाच्या मुलीला आपल्या मातोश्रींकडे सोपवून ठेवून सपत्निक सहभागी झाले.त्यावेळी अयोध्येत झालेल्या तात्पूरत्या बांधकामासाठी आपणास सपत्नीक सिमेंट-वाळू कालवून देण्यात पुण्यकर्म करता आल्याची आठवण बुवा यांनी सांगितली.