सांगली प्रतिनिधी शरद गाडे : सांगली जिल्ह्यातील कोरोना रुग्णांवर खाजगी रुग्णालयात महात्मा फुले आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार करण्यात यावे या मागणीसाठी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने सांगलीत धरणे आंदोलन करण्यात आले असून सांगलीतील स्टेशन चौकात भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष दीपक माने यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले .
शासनाच्या या फसवी योजना जाहीर करणाऱ्या महाविकास आघाडी चा निषेध असो , अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. यावेळी माने म्हणाले की, सरकार एकीकडे सर्व कोरोना रुग्णांवर मोफत उपचार याची घोषणा करीत आहे , तरीसुद्धा दुसरीकडे अनेक गोरगरीब रुग्णांना लाखोंची बिले खाजगी रुग्णालयात दिले जात आहेत.
कोरोनामुळे गेल्या काही महिन्यापासून सर्व स्तरातील लोकांचे अर्थकारण बिघडले आहे लोकांचे रोजगार गेले असून शिल्लक असलेल्या पैसाही खर्च होत आहे, अशा परिस्थितीत कोरोनाच्या आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांना कोणतीही वैद्यकीय बिले आपल्या आवाक्यात बसणारी नाहीत.
गेल्या काही दिवसापासून सांगली शहरात खासगी रुग्णालयांमध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ कुणालाही दिला जात नाही, त्यामुळे रुग्ण व त्यांचे नातेवाईक हादरले आहेत.
मृतदेह अडविण्याचे प्रकार घडत आहेत जिल्हा प्रशासनास ही आम्ही याबाबत निवेदन दिले होेते , रुग्णांवर मोफत उपचार याची कोणतीही नियोजन सध्या खासगी रुग्णालयांमध्ये दिसत नाही. ज्यांना शासकीय रुग्णालयामध्ये दाखवायचे आहे त्यांना ती फुल असल्याने खाजगी रुग्णालयाचा रस्ता दाखवला जात आहे त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या अडचणी वाढल्या आहेत .
लवकरात लवकर जिल्हा प्रशासन व शासनाने यात मार्ग काढून रुग्णांवर मोफत उपचार करावेत अन्यथा प्रश्न मार्गी लागेपर्यंत आंदोलन करण्यात येईल , असा इशाराही यावेळी देण्यात आला.
या आंदोलनात युवा नेते अश्रफ वानकर, राहुल माने, संतोष रुपनर , टायगर ग्रुप अध्यक्ष पिंटुभाऊ माने, अक्षय पाटील, अमित भोसले , राजू जाधव, प्रथमेश वैद्य, युवती अध्यक्ष ज्योती कांबळे, चेतन माडगुळकर, प्रवीण कुलकर्णी, सागर खंडागळे, सोहम जोशी, श्रीराम चव्हाण, रूषी माने, राजू माने, शुभम माने, जगन्नाथ सांळुखे, प्रतीक पाटील, प्रथमेश कुलकर्णी, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.