मिरज प्रतिनिधी नजीर शेख : रक्षाबंधन हा बहिण – भावाचे नाते व्यक्त करण्याचा सण.
या पवित्र दिवसाच्या निमित्याने भाजपा मिरज शहर चे वतीने आज कोरोना या महामारीशी लढणारे योद्धे डॉक्टर , नर्सेस, आरोग्य कर्मचारी, पोलीस व अंगणवाडी सेविका , आशा वर्कर, सफाई कामगार , स्थानिक प्रशासन यांना या निमित्ताने राखी बांधून , सन्मानपत्र देऊन सन्मानित करून त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यात आला.
मिरज शहर पोलिस निरीक्षक राजू तशीलदार ,वाहतूक निरीक्षक क्षीरसागर , आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र ताटे, सेवासदन चे डॉ.रविकांत पाटील, तसेच सफाई व आरोग्य कर्मचारी यांचा राखी बांधून सन्मान करण्यात आला.
यावेळी भाजपा शहर अध्यक्ष बाबासाहेब आळतेकर, राजेंद्र नातू, ग्रामीण अध्यक्ष शंकर शिंदे, महापालिका सरचिटणीस मोहन वाटावे, ईश्वर जनवाडे, नरवाड चे मोहन नागरगोजे तसेच भाजपा महिला आघाडीच्या माजी नगरसेविका जयश्री कुरणे, रुपाली देसाई, अनघा कुलकर्णी, ज्योती कांबळे, अनिता हारगे, गीता नितीन कुरणे, राजश्री हरागे, ग्रामीण शहर अध्यक्षा अश्विनी पाटील आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचा संयोजन शहर अध्यक्ष बाबासाहेब आळतेकर व राजेंद्र नातू व शंकर शिंदे यांनी केले.