कोल्हापूर प्रतिनिधी जावेद देवडी : कोल्हापूर जिल्ह्यात आजअखेर एकूण ७३५२ पॉझीटिव्ह रुग्णांपैकी ३२७० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी दिली.
सोमवार ३ ऑगस्ट रोजी ५ वाजेपर्यंत १६२५ प्राप्त अहवालापैकी १२२८ निगेटिव्ह तर ३२१ अहवाल पॉझीटिव्ह आहेत.(६३ अहवाल प्रलंबित, २ जणांचा दुसराही अहवाल पॉझीटिव्ह, ११ अहवाल नाकारण्यात आले) अॕन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे ४२ प्राप्त अहवालापैकी ३२ निगेटिव्ह, १० पॉझीटिव्ह तर खासगी रुग्णालये/लॅब मधील ११६ पॉझीटिव्ह असे, एकूण ४४७ अहवाल पॉझीटिव्ह आहेत.
सोमवारी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत प्राप्त ४४७ पॉझीटिव्ह अहवालापैकी आजरा- ४, भुदरगड- १, चंदगड- ४, गडहिंग्लज-२, गगनबावडा-३, हातकणंगले- ५६ , कागल-८, करवीर- ४५ , पन्हाळा- २३, राधानगरी- १३, शाहूवाडी- ९, शिरोळ- १९ , नगरपरिषद क्षेत्र- ७८ , कोल्हापूर महापालिका क्षेत्र- १७८ व इतर जिल्हा व राज्यातील – ४ असा समावेश आहे.
आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे – आजरा-१५६ , भुदरगड- १५३ , चंदगड- ३८६ , गडहिंग्लज- २५१ , गगनबावडा- १६ , हातकणंगले- ६५० , कागल- १४९ , करवीर- ८३३ , पन्हाळा- ३१६ , राधानगरी- २४८ , शाहूवाडी- २७८ , शिरोळ- २७६ , नगरपरिषद क्षेत्र- १४८८ , कोल्हापूर महापालिका क्षेत्र- २०४७ असे एकूण ७२४७ आणि इतर जिल्हा व राज्यातील – १०५ असे मिळून एकूण ७३५२ रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.
जिल्ह्यातील एकूण ७३५२ पॉझीटिव्ह रूग्णांपैकी ३२७० रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण २०६ जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या ३८७६ इतकी आहे.