गगनबावडा तालुक्यात १३७ मिमी पाऊसाची नोंद

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:2 Minute, 48 Second

मिडीया कंट्रोल न्युज नेटवर्क (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात १३७ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आज सकाळी ८ वाजेपर्यंतच्या २४ तासात पडलेला आणि आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढील प्रमाणे नोंद झाली आहे.
हातकणंगले – ७.५० (२२८.८८), शिरोळ – ३.८६ (१९९.२९) पन्हाळा- ४९ (६६४.२९), शाहूवाडी- ४३.६७ (९४७.८३ ), राधानगरी- ५५ (९५३.३३), गगनबावडा- १३७ (२६०४), करवीर- २९.०९ (४९५), कागल- ३९.८६ (६६३), गडहिंग्लज- २७.१४ (४८१.५७), भुदरगड- ३६ (७८४.२०), आजरा- ६२.७५ (१०७७.७५ ), चंदगड- ७२.५० (१०७७.८३ ) पाऊस या वर्षी पडल्याची नोंद आहे.

 

 

   धरण पाणीसाठा

तर कोयनेतून ११३९ तर अलमट्टीतून ६९२२ क्युसेक विसर्ग; ५ बंधारे पाण्याखाली

 जिल्ह्यातील राधानगरी धरणात १७१.५९ दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी ७ वा. च्या अहवालानुसार कोयनेतून ११३९ तर अलमट्टी धरणातून ६९२२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जांबरे मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेला आहे.

 

पंचगंगा नदीवरील- इचलकरंजी, शिंगणापूर व रूई, भोगावती नदीवरील –खडक कोगे व वारणा नदीवरील-चिंचोली असे एकूण पाच बंधारे पाण्याखाली आहेत. नजिकच्या कोयना धरणात ५४.२०४ टीएमसी तर अल्लमट्टी धरणात ९१.१३० इतका पाणीसाठा आहे.
जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी ५६.५९ दलघमी, वारणा ६७७.४२ दलघमी, दूधगंगा ४९४.०७ दलघमी, कासारी ५५.३७ दलघमी, कडवी ४३.२९ दलघमी, कुंभी ५६ दलघमी, पाटगाव ७९.७५ दलघमी, चिकोत्रा २३.२० दलघमी, चित्री २९.९१ दलघमी, जंगमहट्टी २५.४९ दलघमी, घटप्रभा ४४.१७ दलघमी, जांबरे २३.२३ दलघमी, कोदे (ल पा) ६.०६ दलघमी असा आहे.
तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम १५.१ फूट, सुर्वे १४.१० फूट, रुई ४२.६ फूट, इचलकरंजी ३७.६ फूट, तेरवाड ३४.६ फूट , शिरोळ २६.६ फूट, नृसिंहवाडी २१ फूट, राजापूर १० फूट तर नजीकच्या सांगली ४.३ फूट व अंकली ३.७ फूट अशी आहे.

 

 

 

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *