कै. श्री. एस. के. वंदूरे पाटील कमानीचे उद्घाटन सोहळा संपन्न..

प्रतिनिधी आसिफ आत्तार

कै. श्नी. एस्. के. वंदुरे पाटील कमानीचे उद्घाटन
आर. के. नगर को.ऑप. हौ. सोसायटी (मुळ) संस्थेच्या वतीने कै. एस. के. वंदुरे पाटील ज्यानी संस्थेसाठी आपले संपुर्ण आयुष्य पणाला लावले.

Advertisements

जवळ- जवळ चाळीस वर्षे वंदुरे पाटील साहेबानी निःस्वार्थ सेवा केली. नागरिकांना नाममात्र भाड्यात गाळे उपलब्ध करुन दिली. त्यांच्या नावाची जणु कमानीच्या स्वरुपात त्यांना पोचपावतीच मिळली.

आज श्नी. एस्. के. वंदुरे पाटील व्यापारी संकुल कमानीचे उद्घाटन आज पार पडले.योगायोग म्हणजे आज श्नी.राम मंदिर भूमिपूजन सोहळा आजच पार पडला.ह्या

मुहूर्तावरच कमान उद्घाटन सोहळा ही पार पडला. सकाळी ठीक साडेबारा वाजता संस्थेचे जेष्ठ संचालक पांडूरंग सुतार यांच्या हस्ते कोविड 19 महामारी च्या नियमांचे पालन करुन उद्घाटन सोहळा  पार पडला.सोशल डीस्टन्स,मास्क, सेनिटराईज यांचा वापर करण्यात आला.

प्रमूख उपस्थीती मा. श्नी. शाहरूख गडवाले भाजपा अ. यु.मो. प्रमूख कोल्हापूर महानगर, सुनिल वंदुरे पाटील, व वंदुरे पाटील कुटुंबीयांची होती. तसेच संस्थेचे अध्यक्ष बी. वाय.डांगे,सेक्रेटरी आर. ए. मेळवंकी, खाजानीस के. बी. पाटील, जे.एच. बहादुरे,जी. आर. निगडीकर,एच. पी. रेंदाळकर, अशोक कबुरे,सभासद, गाळेधारक, नागरीक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *