अयोध्येत श्रीराम मंदिराचा भूमिपूजन सोहळा होत असताना वळीवडे श्रीराम मंदिरामध्ये मूर्तीला अभिषेक घालून गुढी उभारण्यात आली.

कोल्हापूर प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : अयोध्येत श्रीराम मंदिराचा भूमिपूजन सोहळा होत असताना       वळिवडे येथे गावचे प्रथम नागरिक अनिल पंढरे (सरपंच) तसेच प्रतिष्ठित नागरिक संजय चव्हाण, उदय पोवार, दत्तात्रय पोवार, रवी जाधव, दगडू खांडेकर, यांच्या शुभ हस्ते श्रीराम मंदिरामध्ये सकाळी श्रीरामांच्या मूर्तीला अभिषेक घालण्यात आला असून  बाळासाहेब पोवार यांच्या हस्ते गुढी उभारण्यात आली.

 या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य संजय चौगुले, गोपालदास दर्डा, विक्रम मोहिते, विजय खांडेकर, योगेश खांडेकर, प्रशांत जाधव, डॉ.प्रविण जाधव, बाबासो पाटील, रावसाहेब दिगंबरे,  शशी खांडेकर, राजेंद्र रेपे,  उपस्थित होते.

Advertisements

 दुपारी १२:०० वाजता  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मंदीरामध्ये दीपोत्सव व भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यावेळी आयोध्येमध्ये होणाऱ्या कार्यक्रमाचे लाइव्ह प्रक्षेपण पाहण्यासाठी प्रोजेक्टरची सोय करण्यात आली होती.

 कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर साखर पेढे वाटुन आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या प्रसंगी  उदय पाटील , जितेंद्र कुसाळे, दिगंबर खांडेकर , संदीप पोवार,रावसाहेब गुरव , कानिफनाथ पंढरे, अरूण पंढरे, प्रविण पोवार, वैभव चव्हाण, वारकरी व महिला ग्रामस्थ उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *