अॅड.पंडितराव सडोलीकर यांच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या हॉस्पिटलांवर कारवाई करा : कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन

कोल्हापूर. शिवाजी शिंगे :जिल्हात कोविड-१९ चा संसर्ग झपाट्याने वाढत आहे.  कोविड -१९ च्या बरोबर अन्य कोणत्याही  आपत्तीला रोखण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सक्षम आहेत,  परंतु कोविड-१९ रुग्णांव्यतिरिक्त अन्य रुग्णांना देखील आवश्यक ते सर्व औषधोपचार व परिपुर्ण वैद्यकीय सुविधा मिळणेही गरजेचे असून डॉक्टर व हॉस्पिटल यांचे प्रमुख कर्तव्य आहे.

  मात्र कोल्हापुरातील नामांकित वकील आणि जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अॅड.पंडितराव सडोलीकर यांना सोमवारी ३ ऑगस्ट रोजी रात्री १२ च्या सुमारास हृदयविकाराचा त्रास होऊ लागल्याने, त्यांच्या मुलांनी त्यांना रात्री १२.०० ते १.३० च्या दरम्यान  दुर्वाकर हॉस्पिटल, कृष्णा हॉस्पिटल, मंगलमूर्ती  हॉस्पिटल (शास्त्रीनगर ), सिद्धिविनायक हॉस्पिटल,  मोरया हॉस्पिटल,  महालक्ष्मी हॉस्पिटल,  ऑस्टर आधार हॉस्पिटल  या ठिकाणी रूग्णास दाखल करण्याची विनंती केली. परंतु तेथे उपस्थित असणाऱ्या डॉक्टरांनी निरनिराळी कारणे सांगून रुग्णास दाखल करून घेतले  नाही. त्यामुळे  वेळेत उपचार न मिळाल्याने अॅड. पंडितराव सडोलेकर यांना आपला जीव गमवावा लागला असल्याने अॅड.पंडितराव सडोलीकर यांच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या हॉस्पिटलांवर कारवाई करण्यात यावी.

Advertisements

असे पत्रक कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनने जिल्हा पोलीस प्रमुख यांना दिले.

तसेच रुग्णास दाखल करून न घेणे, वैद्यकीय सुविधा व औषधोपचार न करता परत पाठवणे हे कृत्य निष्काळजीपणाचे व बेजबाबदारपणाचे आहे. या हॉस्पिटलांकडून रुग्णाचा हक्क व अधिकाराचा अक्षम्य भंग झाला असून त्यांनी कर्तव्यात कसूर केलेली आहे. त्याचप्रमाणे विविध कायदे नियम, आणि मार्गदर्शक तत्वाचे उल्लंघन झाले आहे.

 हा प्रकार केवळ निदनिय नसून तो एक गुन्हा ही असल्याने त्या सर्व हॉस्पिटलचे सीसीटीव्ही चित्रीकरण जप्त करून सर्वांची कसून चौकशी करून त्या सर्व हॉस्पिटल्स व  दोषी डॉक्टर्स, स्टाप यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. असेही कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन, कोल्हापूर यांनी पत्रकाद्वारे म्हंटले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *