Share Now
गेल्या दोन दिवसापासून कोल्हापूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कोल्हापूर शहरातील काही सखल भागात पावसाचे पाणी साचले होते.
याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री ना. सतेज उर्फ बंटी पाटील, आ. चंद्रकांत जाधव, महापौर निलोफर आजरेकर, मनपा आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, नगरसेवक राहुल चव्हाण व शारंगधर देशमुख यांच्या सोबत शहरातील काही ठिकाणी भेट देऊन पूर परिस्थितीची पाहणी केली.
व स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. तसेच, संभाव्य पूर परिस्थितीसाठी सर्व यंत्रणा तयार ठेवण्याच्या सूचना पालकमंत्री यावेळी अधिकाऱ्यांना केल्या.
तसेच भागातील नगरसेवक राहुल चव्हाण यांनी सुतारवाडा, कुंभार गल्ली, शाहूपुरी, महावीर गार्डन पिछाडीस, नागरिकांना खबरदारी घेण्यास सांगितले व काही अडचण आल्यास तात्काळ फोन करा मी मदतीस आहे असेही चव्हाण म्हणाले,
Share Now