प्रतिनिधी : जावेद देवडी
एक ऑगस्ट रोजी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून माजी महापौ सो. सूरमंजिरी काटकर यांच्या निधीतून विचारे माळ.
कोल्हापूर येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने बांधण्यात येणाऱ्या संस्कृती हॉलची भूमिपूजन करण्यात आले.
सदर कार्यक्रम कोरोना महामारी मुळे कमीतकमी नागरिक आणि सोशल डिस्टंसिंग चे पालन करून साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा.राजेश लाटकर यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी मा.राजेश लाटकर यांनी आपल्या भाषणातून अण्णाभाऊंच्या सामाजिक कार्याच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला,
अण्णाभाऊंनी साहित्यातून दिलेली सामाजिक योगदान स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री अमर हेगडे, उपाध्यक्ष राहुल तलवारे, विजय हेगडे उपस्थित होते, त्तर भागातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सदाशिव लाला कांबळे, शामराव सकटे, कृष्णा बिरांजे यांचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अमर सकटे यांनी केले तर संयोजक प्रवीण आजरेकर, सर्जेराव दाभाडे, विनायक दाभाडे, विजय साळवे, विजय थडके यांनी केले.