Share Now
मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क
कु. प्रेरणा पाटील हिला १० वी मध्ये प्रेरणादायी यश
उषाराजे हायस्कूलची
कु. प्रेरणा पाटील ही १०वी मध्ये ९७.६०% इतक्या गुणांसह उत्तीर्ण झाली.
कोणत्याही महागड्या क्लासेसची आवश्यकता नसते फक्त नियमित सराव व वाचन, चिंतन मनन यावर भर दिल्याने हे यश मिळाल्याचे तिने सांगितले.
पुढे सायन्स मध्ये प्रवेश घेऊन आयएएस अधिकारी होणार असुन त्यासाठी भरपूर कष्ट करुन ते पूर्णत्वास नेणार असल्याचेही तीने सांगितले.
तिला संस्कृत या विषयांमध्ये १०० पैकी १०० गणित याविषयात ९८ तर सायन्स या विषयामध्ये ९६ गुण मिळाले आहेत.
तसेच ती जायंट्स ग्रुप ऑफ कोल्हापूर या सामाजिक संस्थेचे माझी अध्यक्ष व कर सल्लागार तानाजी पाटील यांची कन्या असून तिला समाजसेवेची आवड आहे. जायंट्स ग्रुप मध्ये व समाजामध्ये सर्वत्र मिळालेल्या उत्तुंग यशाचे तिचे कौतुक होत आहे.
Share Now