मिडीया कंट्रोल न्युज नेटवर्क : कुंभार समाजावर अन्याय होत आहे. कारण काही लोक गणेश मूर्ती बाबत इतर लोकांमध्ये अफवा पसरवित आहेत की, संत गोरा कुंभार वसाहत(बापट कॅम्प) , शाहूपुरी , गंगावेश कुंभार गल्ली, येथील कुंभार बांधवांनी कमी प्रमाणात गणेशमूर्ती तयार केल्या आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गणेश मूर्ती तयार झाल्या नाहीत अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. असे कोल्हापूर जिल्हा कुंभार समाज विकास फौंडेशनने पत्रकाद्वारे म्हंटले आहे.
दरवर्षीप्रमाणे या वर्षीही कुंभार बांधवांनी मोठ्या प्रमाणात गणेशमूर्ती बनविलेल्या असून कुंभार समाजातील बांधवांनी सर्वांना लहान व मोठ्या गणेश मूर्ती मिळतील, अशी रचना केली आहे तरी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका, असेही आवाहन समस्त कोल्हापूर जिल्हा कुंभार समाज विकास फौंडेशन च्या वतीने संजय निगवेकर (काका), प्रकाश अर्जुन सरवडेकर(कुंभार), एम व्ही कुंभार ,अभिजित वागवेकर व अक्षय कुंभार यांनी केले आहे.