कोल्हापूर प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गांधीनगर (ता. करवीर) येथील इंदिरानगर वसाहतीमधील नागराज ग्रुप यावर्षी गणेशोत्सव साजरा करणार नसून येणारी वर्गणी कोरोना प्रतिबंधक उपाययोजनेसाठी खर्च करणार आहे. तसा निर्णय ग्रुपच्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
अध्यक्षस्थानी ग्रुपचे अध्यक्ष आशुतोष महापुरे होते.
कोरोना महामारीमुळे नागरिकांची आर्थिक घडी विस्कटली आहे. देश व राज्यपातळीवर प्रशासन या महामारीशी लढत आहे. नागराज ग्रुपही कोरोनावर मात करण्यासाठी उपाय योजना करत असून त्यासाठी गणेशोत्सव साजरा न करण्याचा ठराव ग्रुपने केला आहे.
देणगी रकमेतून मास्क, सॅनिटायझरचे वाटप वसाहतीमधील नागरिकांना करण्यात येणार आहे. ग्रुपचा हा निर्णय गांधीनगर पोलीस ठाण्यास कळविण्यात आला आहे.
तसेच कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साजरा न करण्याच्या ठरावाची प्रत गांधीनगर पोलिसांना नागराज ग्रुपच्या कार्यकर्त्यांकडून देण्यात आली.
यावेळी बैठकीस गणेश आवळे, शिवाजी धनवडे, विठ्ठल भाचकर, सनी जगताप व सनी महापुरे आदि संचालक उपस्थित होते.