महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा रुग्णांना लाभ द्या- पालकमंत्री सतेज पाटील

प्रतिनधी : अतुल पाटील

म. ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा कोरोना रुग्णांना लाभ द्या, असे निर्देश पालकमंत्री सतेज पाटील यांनी देतानाच, गेल्या पाच महिन्यात केलेल्या कामाबद्दल प्रशासकीय यंत्रणेचे त्यांनी अभिनंदन केले.ग्रामीण भागातील सरपंच, ग्रामसेवक, आशा, अंगणवाडी सेविका त्यांचेही अभिनंदन अधिकाऱ्यांनी करण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली.

Advertisements

जिल्हाधिकारी कार्यालयात २१ मे २०२० च्या अधिसूचनेच्या अंमलबजावणी बाबत सर्व तहसीलदार, गट विकास अधिकारी यांची व्हीडीओ काॕन्फरंसिंगद्वारे बैठक झाली. या बैठकीत पालकमंत्री सहभागी झाले होते.

यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॕ योगेश साळे, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समन्वयक संजय शिंदे उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांना बेड उपलब्ध व्हावेत. रुग्णांची गैरसोय होवू नये यासाठी खासगी डाॕक्टर्सना प्रत्यक्ष भेटून सूचना करा. जादा बिलाची आकारणी होणार नाही, यासाठीही चर्चा करुन अंमलबजावणी करावी. बिलांची तपासणी होईल याचे नियोजन करा. म. फुले जनआरोग्य योजनेचा लाभ कोरोना रुग्णांना मिळायला हवा.

कोरोनाच्या अनुषंगाने सगळेजण चांगले काम करत आहात. पूर नियंत्रणातही चांगले काम करत आहात. त्याबद्दल अभिनंदन करुन यापुढेही अजून चांगलं काम करा. तुमच्या खालील यंत्रणांचेही अभिनंदन करा, असेही ते म्हणाले.

जिल्हाधिकारी श्री.देसाई म्हणाले,म. फुले जनआरोग्य योजनेत जी रुग्णालये आहेत, तेथे कोरोना रुग्णांना लाभ द्या. रुग्णांसाठी बेड उपलब्ध होईल यासाठी नियोजन करा. अवाजवी बील तपासणीसाठी आॕडीटर्सची नेमणूक करा. पूर नियंत्रणाच्या नियोजनाप्रमाणे बाधितांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर सुरु ठेवा. कोणतीही जीवित हानी होणार नाही, याकडे विशेष लक्ष द्या.

रुग्णांना आॕक्सीजनची गरज आहे, त्यासाठी आॕक्सीजनचे सिलेंडर दिले आहेत. त्याची कमतरता पडणार नाही, याची दक्षता घेण्याची सूचना श्री. मित्तल यांनी केली.

डाॕ साळे यांनी, अधिसूचना काय आहे, त्यात कोणत्या बाबींचा समावेश आहे, याबाबत मार्गदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *