विशेष प्रतिनिधी संतोष कुरणे
सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका मृत व्यक्तीचे स्वागत करणारी देशातील पहिली महानगरपालिका ठरली आहे.
सत्ताधारी व मनपा प्रशासन यांचे डोके ठिकाणावर आहे का असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.
एखाद्या घरचा आधार करता व्यक्ती गेल्यानंतर त्यांच्यावर आभाळ कोसळते संपूर्ण परिवार व नातेवाईक व हितचिंतक दुःखाच्या सागरात बुडतात. परंपरेनुसार मृतदेहावर अंत्यसंस्कार करणे प्रसंगी दुःखद भावनेने मृतदेहावर समाजातील लोक एकत्र येऊन विधी करतात.
या दु:खाच्या समयी सुस्वागतम फलक लावून डिझेल दाहिनी चे उद्घाटन करणे लोकांच्या भावनेशी खेळण्यासारखे आहे.
सवंग लोकप्रियतेसाठी शहराचे आमदार सुधीर दादा गाडगीळ, महापौर संगीता सुतार शहरातील प्रथम नागरिक यांना ही उद्घाटन प्रसंगी भान राहिला नाही.
व मनपा अधिकारी लोकांच्या भावनेशी खेळतात
याआधीही मृतदेह शेव वाहीकेत ठेवल्या नंतर शववाहिका बंद पडून नातेवाईकांना ढकलण्याचा लाजिरवाणा प्रकार घडला आहे.
तसेच शववाहिका मिळत नसल्यामुळे मृतदेह मालवाहतूक टेंपो मधून नेण्याची नामुष्की ओढावली होती.
लोकांच्या भावनेशी खेळ खेळणाऱ्या सत्ताधारी व मनपा प्रशासन यांचा मा. मदन भाऊ पाटील युवा मंचच्या कडून जाहीर निषेध करण्यात येत आहे .
यापुढे असा प्रकार घडल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करून सत्ताधारी व मनपा प्रशासनाचे डोके ठिकाण्यावर आणण्याचे काम युवा मंचाच्या वतीने करण्यात येईल.
असा इशारा जिल्हा अध्यक्ष आनंद लेंगरे
मा.मदनभाऊ पाटील युवा मंच यांनी दिला,