मिरज प्रतिनिधी : नजीर शेख
सांगली महापालिका क्षेत्रात वाढणारी रुग्ण संख्या आणि अपुरे पडणारे हॉस्पिटल याचा विचार करून मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी महापालिकेचे 100 बेडचे कोविड हॉस्पिटल उभारण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
रविवारी मनपाचे सर्व पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून कोविड हॉस्पिटलबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
महापालिकेकडून सुरू करण्यात येणाऱ्या 100 बेडच्या कोविड हॉस्पिटलमध्ये ॲाक्सिजन बेडची व्यवस्था असणार आहे.
त्यामुळे या रुग्णालयात येणाऱ्या रुग्णाला ऑक्सिजन मिळेल अशी व्यवस्था असणारे 100 बेडचे हे कोविड हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे.
यासाठी मनपा क्षेत्रात जागेचा शोध सुरू करण्यात आला असून 100 बेड आणि अन्य सामग्री बसणारी जागा किंवा मंगल कार्यालयाचा हॉल यासाठी निवडला जाणार आहे.
याबाबत उद्या रविवारी मनपा पदाधिकारी यांच्या सोबत बैठक घेऊन या 100 बेडच्या हॉस्पिटलचे नियोजन केले जाणार आहे.
महापालिकेकडून जागेची निश्चिती होताच तात्काळ 100 बेडचे हॉस्पिटल उभारण्यास सुरू होईल आणि याचा सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील जनतेसाठी उपयोग करता येईल अशी माहिती मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली.