Getting your Trinity Audio player ready...
|
राधानगरी प्रतिनिधी अतुल पाटील : जिल्ह्यातील राधानगरी धरणात २३६.७९ दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी ७ वा. च्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून १४०० व सांडव्यातून २८५६ असा एकूण ४२५६ तर अलमट्टी धरणातून २२०००० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जांबरे मध्यम प्रकल्प व जंगमहट्टी मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेला आहे.
पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रूई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील- शिरगाव, राशिवडे, हळदी, खडक कोगे, सरकारी कोगे व तारळे. तुळशी नदीवरील बी, आरे. कासारी नदीवरील- कुंभेवाडी, कांटे, करंजफेण, पेंडाखळे, बाजारभोगाव, वालोली, पुनाळ तिरपण, ठाणे आवळे व यवलुज. कुंभी नदीवरील- शेणवडे, मांडुकली, सांगरूळ, कळे व वेतवडे. धामणी नदीवरील- सुळे, आंबर्डे, पनोरे. वारणा नदीवरील-चिंचोली, माणगाव, कोडोली, खोची, तांदूळवाडी, मांगलेसावर्डे, शिगाव व चावरे. कडवी नदीवरील- सवतेसावर्डे, शिरगांव, सरूडपाटणे, बालूर, भोसलेवाडी, येलूर व कोपार्डे. दुधगंगा नदीवरील-सिध्दनेर्ली, बाचणी, सुळकूड, दत्तवाड, सुळंबी, कसबा वाळवे व तुरंबे. वेदगंगा नदीवरील-निळपण, वाघापूर,गारगोटी, म्हसवे, कुरणी, सुरूपली, बस्तवडे व चिखली, हिरण्यकेशी नदीवरील-साळगाव, ऐनापूर, गिजवणे, निलजी, हरळी, खणदाळ, देवर्डे, चांदेवाडी व जरळी. घटप्रभा नदीवरील-पिळणी, बिजूरभोगोली, हिंडगांव गवसे, कानडे सावर्डे, आडकूर, तारेवाडी व कानडेवाडी, ताम्रपर्णी नदीवरील-कुर्तनवाडी, चंदगड, हल्लारवाडी, कोवाड, माणगाव, व कामेवाडी असे ८५ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
नजिकच्या कोयना धरणात ७१५.५५ टीएमसी तर अल्लमट्टी धरणात ९४.९९९ इतका पाणीसाठा आहे.
जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी ९८.२९ दलघमी, वारणा ९७४.१९ दलघमी, दूधगंगा ७१९.१२ दलघमी, कासारी ७८.५७ दलघमी, कडवी ७१.२२ दलघमी, कुंभी ७६.८३४ दलघमी, पाटगाव १०५.२४ दलघमी, चिकोत्रा ४३.११५ दलघमी, चित्री ५३.२९ दलघमी, जंगमहट्टी ३४.६५ दलघमी, घटप्रभा ४४.१७ दलघमी, जांबरे २३.२३ दलघमी, कोदे (ल पा) ६.०६ दलघमी असा आहे.
तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम ४४.८ फूट, सुर्वे ४१.८ फूट, रुई ७१.६ फूट, इचलकरंजी ६६.६ फूट, तेरवाड ५८ फूट, शिरोळ ५४.३ फूट, नृसिंहवाडी ५३.९ फूट, राजापूर ४२.३ फूट तर नजीकच्या सांगली २२.७९ फूट व अंकली २९.६ फूट अशी आहे.
गगनबावडा तालुक्यात ९७.५० मिमी पाऊस
कोल्हापूर जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात ९७.५० मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात आज सकाळी ८ वाजेपर्यंतच्या २४ तासात पडलेला आणि आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये. कंसातील आकडे एकूण पावसाचे आहेत.
हातकणंगले- ७.१३ (३५१.८८ ), शिरोळ- ४.७१ (२८५.५७), पन्हाळा- ३१.८६ (९४४), शाहूवाडी- ३३ (११८३.६७), राधानगरी- ४४.६७ (१३२९.५०), गगनबावडा- ९७.५० (३४१०), करवीर- १५.७३ (७२२), कागल- १७.५७ (९४०.४३), गडहिंग्लज- १४ (६४०.२९ ), भुदरगड-३४ (१०२७.४०), आजरा- ५०.७५ (१४६८.२५ ), चंदगड- ५२.६७ (१४८५.३३) पाऊस या वर्षी पडल्याची नोंद आहे.