विशेष प्रतिनिधी शरद गाडे
भिम सेना सांगली या सामाजिक संघटनेच्या वतीने अयोध्या येथील सुन्नी वक्फ बोर्ड मुस्लिम समाज यांनी घेतलेल्या निर्णयाचे लाडू वाटून आनंद साजरा करण्यात आला.
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार येथे सुन्नी वक्फ बोर्डाला मशिदी साठी पाच एकर जागा दिली होती पण सध्या संपूर्ण जगावर करोना या रोगाचे महामारी संकट आले आहे.
यामध्ये आपला भारत देश ही या महामारी ने ग्रासला आहे अशा परिस्थितीमध्ये आपल्या भारतीय मुसलमान समाजाने सुन्नी वक्फ बोर्ड दिल्ली यांनी सरकारने दिलेले पाच एकर जागा ही एम्स दर्जाचे हॉस्पिटल करता देण्याचा जो निर्णय घेतला आहे तो स्वागतार्थ आहे.
भारतीय मुस्लिम समाज हा आपल्या देशाच्या प्रती नेहमी हळवा राहिलेला आहे त्यांच्या पवित्र ग्रंथात अखंड मानवतेचा विज्ञानवादी संदेश दिलेला आहे.
आणि त्याचे तंतोतंत पालन आपला भारतीय मुस्लिम समाज नेहमी करत आलेला आहे भारत देशावर आलेल्या कोणत्याही संकटाच्या समयी संपूर्ण मुस्लिम समाज हा सर्वांच्या पाठीशी राहिलेला आहे आणि सध्याच्या वातावरणाचा विचार करता आपला देश महा रोगामुळे संकटात असताना सरकार मात्र राम मंदिराचे भूमिपूजन मध्ये व्यस्त आहे.
परंतु मुस्लिम समाजाने त्या पाच एकर जागेत मशिद न बांधता त्या ठिकाणी जनकल्याणाचा व मानवतेचा विचार करून एक भव्यदिव्य एम्स दर्जाचे भले मोठे हॉस्पिटल बांधण्याचा निर्णय घेऊन संपूर्ण जगाला समतेचा व मानवतेचा संदेश दिला आहे.
याप्रसंगी भिम सेनेचे संस्थापक अध्यक्ष सतीश मोहिते व पदाधिकारी असंख्य कार्यकर्ते लाडू व मिठाई वाटप करून आनंद साजरा केला.