अत्याधुनिक फायबर ग्लास यांत्रिक बोटींचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा..

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:2 Minute, 25 Second

सांगली प्रतिनिधी शरद गाडे

गतवर्षी सांगली जिल्ह्याने भीषण महापुराचा सामना केला. त्यातुन जिल्ह्यात अद्ययावत अशा यांत्रिक बोटींची गरज अधोरेखित झाली. भविष्यात महापूराची स्थिती निर्माण झाल्यास जिल्ह्यात बोटींची सुसज्जता असावी यासाठी जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या निर्देशानुसार जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत नाविण्यपूर्ण योजनेतून फायबर ग्लास यांत्रिक बोटी खरेदी करण्यात आल्या. या बोटींचे लोकार्पण पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले. यावेळी बोटींची पहाणी करताना अत्यंत सुंदर अशा बोटींची निर्मिती केल्याबद्दल त्यांनी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुड्डेवार आणि पुरवठादार व्ही. डी. जामदार यांचे कौतुक केले.
कृष्णा घाट सांगली येथे जिल्ह्यातील कृष्णा, वारणा नदी काठावरील पूर बाधित गावांना फायबर ग्लास यांत्रिक बोटींचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, आमदार डॉ. सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार मानसिंगराव नाईक, जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुड्डेवार, महानगरपालिकेचे पदाधिकारी आदि उपस्थित होते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *