कोल्हापूर : शिवाजी शिंगे
करवीर नगरीमध्ये सेवाव्रत प्रतिष्ठानच्या माध्यमातून कै.माधवराव साळुंखे तथा दादा यांच्या नावे मोफत अन्नछत्र सुरु करण्यात आलेले आहे.
श्री राम जन्मभूमी संघर्षांमध्ये ज्ञात-अज्ञात कारसेवकांनी आपल्या जिवाची पर्वा न करता आपल्या प्राणाची अहुती देऊन विरगतीप्राप्त केली,
अशा कारसेवकांना आदरांजली व एक संकल्प म्हणून रामजन्मभूमी मुक्तीचे संघर्षाला पाचशे वर्ष होऊन गेली तेव्हा कुठे आपल्याला भूमिपूजन करण्यास संधी मिळाली.
अनेक विघ्न,अनेक अडचणी आल्या, तरी सुद्धा हिंदू समाज कुठे डगमगला नाही व श्री रामांच्या कृपाशीर्वादाने जन्मभूमी मुक्त झाली.
आता लवकरात लवकर कोणतेही विघ्न न येता भव्यदिव्य असं श्री रामांचे मंदिर उभे राहू दे व देशातील तमाम एकशे तीस कोटी राम भक्तांना दर्शन होऊ दे हा उद्देश मनात ठेवून सेवाव्रत प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी अकरा दिवसाचा संकल्प सोडला आहे. या निमित्ताने कोल्हापुरातील भुकेलेल्यांच्या मुखात दोन घास जाऊन श्रीराम मंदिर कोणतेही विघ्न न येता लवकरात लवकर पूर्ण होऊन दे
असा आशीर्वाद या सर्व गोरगरीबांचा भुकेलेल्यांचा मिळावा म्हणून 11 दिवस संकल्प सोडला होता या संकल्पाचा आजचा
पाचवा दिवस.
अन्नदानाचा कार्यक्रमात स्वयंपुर्ती ने काम करणारी स्वयंसेवक संयोजक बंडा उर्फ संभाजी साळुंखे, सचिन मांगुरे, माहादेव लोहार, पंकज पोवार, क्रुष्णात साळोखे, मोहन देवाळकर, आकाश हुंचाळे, विस्वास ईरगार, नितेश कोकीतकर, वैभव पोवार, विराज पाटील, दिपक वडणगेकर, केदार मोरे सहभाग घेतला.