सांगली प्रतिनिधी: शरद गाडे
९ ऑगस्ट, क्रांती दिन. इंग्रजी राजवटीला हादरवून टाकणारा दिवस. देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून देशभर चळवळ पेटलेली होती. त्यासाठी शेकडो लोकांनी हौतात्म्य पत्करले. या हुतात्म्यांना आज काँग्रेस पक्षाच्या वतीने शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील आणि काँग्रेस सेवादलाच्या महाराष्ट्राच्या अतिरिक्त महिला प्रदेशाध्यक्षा सौ.वृषाली वाघचौरे यांच्या प्रमुख उपस्थितीत अभिवादन करण्यात आले.
यानिमित्ताने महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, वसंतदादा पाटील, अण्णासाहेब पत्रावळे, कर्मवीर भाऊराव पाटील, अण्णा भाऊ साठे, गुलाबराव पाटील, स्वामी रामानंद भारती या थोर नेत्यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मार्केट यार्ड समोरील हुतात्मा स्मारकाच्या ठिकाणी झेंडावंदन करण्यात आले. स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्या ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिकांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
यावेळी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक माधवराव माने, स्वातंत्र्यसैनिक चंद्रकांत गोरे, रघुनाथ नार्वेकर, गोंडाजी, कुपवाड शहर काँग्रेसचे अध्यक्ष सनी धोत्रे, सचिन चव्हाण, विजय जाधव, सांगली जिल्हा सेवादलाचे कार्याध्यक्ष अरुण पळसुले, रामसिंग परदेशी, अनिल माने, अशोकराव पोरे, विठ्ठल काळे, रोटरी क्लबचे बने, इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
—————————–