राधानगरीतून ४२५६ तर अलमट्टीतून ३९००० क्युसेक विसर्ग

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:2 Minute, 24 Second

कोल्हापूर प्रतिनिधी अतुल पाटील :  राधानगरी धरणात २३५.१४ दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी ७ वा.च्या प्राप्त अहवालानुसार राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजा क्र. ३ व ६ उघडले असून धरणातून ४२५६ तर अलमट्टी धरणातून ३९००० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.  जांबरे मध्यम प्रकल्प व जंगमहट्टी मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेला आहे.

पंचगंगा नदीवरील-  शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रूई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील- राशिवडे, हळदी, सरकारी कोगे व खडक कोगे. तुळशी नदीवरील बीड, कासारी नदीवरील- बाजारभोगाव, वालोली, पुनाळ तिरपन, ठाणे आळवे व यवलूज.  कुंभी नदीवरील- शेनवडे, सांगरूळ व कळे. वारणा नदीवरील-चिंचोली व माणगांव, दुधगंगा नदीवरील-सिध्दनेर्ली, बाचणी, सुळकूड व दत्तवाड, वेदगंगा नदीवरील- वाघापूर,कुरणी, सुरूपली, बस्तवडे व चिखली असे एकूण ३१ बंधारे पाण्याखाली आहेत. नजिकच्या कोयना धरणात ७५.३४ टीएमसी तर अल्लमट्टी धरणात १००.७८६ टीएमसी इतका पाणीसाठा आहे.

 जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी ८१.७४ दलघमी, वारणा ८३८.३२ दलघमी, दूधगंगा ६२८.५५  दलघमी, कासारी ६५.४८ दलघमी, कडवी ६३.९० दलघमी, कुंभी ६१.५७ दलघमी, पाटगाव ९७.४८ दलघमी, चिकोत्रा २९.८६  दलघमी, चित्री ५०.३९७ दलघमी, जंगमहट्टी ३४.६५१ दलघमी, घटप्रभा ४४.१७०   दलघमी, जांबरे २३.२३० दलघमी, कोदे (ल पा) ६.०६० दलघमी असा आहे.

 तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम ३८.२  फूट, सुर्वे ३७.६ फूट, रुई ६९.२  फूट, इचलकरंजी ६५  फूट, तेरवाड ५७ फूट, शिरोळ ५१.६  फूट, नृसिंहवाडी ५०  फूट, राजापूर ३९.३ फूट तर नजीकच्या सांगली १४.६  फूट व अंकली २२.८ फूट अशी आहे.

 

 

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *