सांगली प्रतिनिधी शरद गाडे : कोरोनाच्या साथीमुळे अनेकांचे उद्योग व्यवसाय, व्यापार देशोधडीला लागले आहेत. या वारांगना महिलांच्या व्यवसायावर सुद्धा परिणाम झाला आहे. त्यामुळे या महिलांची ही गरज ओळखून १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सांगली येथील सुंदरनगर, गोकुळ नगर व राजमाने चाळ मधील २५० वारांगनामहिलांना महिला बाल कल्याण अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार आमदार सुधीरदादागाडगीळ यांनी पी.एन.जी. ग्रुप तसेच सराफकट्टा गणेशोत्सव मंडळ व भाजपा युवा मोर्चाकडून मदतीचा हात म्हणून या महिलांना जीवनावश्यक साहित्याचे किट वाटप करण्यात आले.
यावेळी महापौर गीताताई सुतार, महाराष्ट्र भाजपा अल्पसंख्यांक उपाध्यक्ष मुन्नाभाई कुरणे, भाजप युवा मोर्चा अध्यक्ष दिपक माने, नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, नगरसेविका अनारकली कुरणे, भाजपाच्या महिला पदाधिकारी गीता पवार, मकरंद म्हामुलकर, अतुल माने, महिला बालविकास विभागाच्या कार्यालय प्रमुख दीपिका बोराडे, सामाजिक कार्यकर्ते जमीर कुरणे, प्रफुल्ल ठोकळे, सूरज पवार, सामाजिक कार्यकर्ते दिपक चव्हाण, गणपती साळुंखे, धनेश कातगडे, विश्वजीत पाटील, राहुल माने, प्रथमेश वैद्य, अनिकेत बेळगाव, कुष्णा राठोड ,शांतिनाथ कर्वे, अनिकेत खिलारे, सोहम जोशी , चेतन माडगूळकर, शुभम माने , श्रीराम चव्हाण, संरक्षण अधिकारी शिवनेरी केदार आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व शासकीय अधिकारी या भागातील नागरिक उपस्थित होते.