प्रतिनिधी : सतीश चव्हाण
१५ऑगस्ट 73 वा भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त जायंटस ग्रुप ऑफ कोल्हापूर यांनी १६जून रोजी गलवान घाटी मध्ये चीनी सैनिकांच्या झडपेत शहीद झालेल्या वीस वीर जवानांना ग्रुप तर्फे अध्यक्ष प्रदीप घाटगे, राजारामपुरी पोलिस इन्स्पेक्टर सिताराम डूबल साहेब,माझी सैनिक अध्यक्ष देविदास औताडे, मिलिटरी हॉस्पिटलच्या वैध्यकिय अधिकारी डॉ.सुनंदा नाईक यांचे हस्ते फोटोस पुष्पहार अर्पण करून व ज्योत पेटउन आदरांजली वाहिली,
त्याच बरोबर कोरोना योध्ये दिवंगत डॉक्टर्स व पोलीस यांना फुले अर्पण करून आदरांजली वाहिली.
सदर कार्यक्रमात मिलिटरी हॉस्पिटलचे डॉ. पार्थ भिंगार्डे, डॉ. बसगोंडा पाटील, श्री शिवाजी देवरडेकर ,रेडिओ ग्राफर, विद्या इंडीगिरी, शिवाजी हजारे, शितोळे हॉस्पिटलची डॉ.महेश्वर शितोळे, पोलीस दल,व सांदिपनी विद्यासागर विद्यालय,(बापूराम नगर कळंबा) चे मुख्यध्यापक श्री अमोल गावडे सर,यांना गुलाब फुले देऊन सन्मान करण्यात आला.
व आर्सेनिक अल्बम३०गोळ्या वाटल्या.
या कार्यक्रमास जायंटस वेल्फेअरचे सचिव प्रकाश क्षीरसागर, फेडरेशन ऑफिसर डॉ.प्रा.महादेव शिंदे सर,आय.पी.पी.तानाजी पाटील,माझी अध्यक्ष शहाजी शिंदे, प्रकाश मालेकर, खाजनिस लक्ष्मण कांबळे,सौ.श्रद्धा घाटगे, श्रुती कांबळे व ऋषिकेश घाटगे उपस्थित होते.