रेंदाळ एम.आय. एम. शाखेकडून वृक्षारोपण आणि मास्क वाटप करण्यात आले.

विशेष प्रतिनिधी : जावेद देवडी

कोल्हापूर : ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुस्लिमीन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र युवा प्रवक्ते प्रा.शाहिद शेख यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका अध्यक्ष सलमान नाईकवडे,तालुका निरीक्षक दाऊद मुल्लाणी यांच्या नेतृत्वाखाली रेंदाळ शहर अध्यक्ष सद्दाम हकीम यांच्या अध्यक्षतेखाली स्वातंत्र दिनाचे औचित्य साधून ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुस्लिमीन रेंदाळ शाखेकडून वृक्षारोपण व माक्स वाटप करण्यात आले.

Advertisements

भारतरत्न डांँ.ए.पी.जे अब्दुल कलाम उर्दू हायस्कुल आणि कुमार विद्या मंदिर मराठी विद्यालय येथे वृक्षारोपण करण्यात आले तर गणेश मंदिर,नदाफ गल्ली,हकीम मोहल्ला तब्बल ४० वृक्षारोपण व १०० मास्क वाटप कण्यात आले.

त्यावेळी हातकणंगले तालुका अध्यक्ष सलमान नाईकवडे म्हणाले यापुढे एम.आय.एम पक्षाकडून सामाजिक उपक्रमव्दारे पक्ष विस्तारासाठी समाज विधायक कामांवर भर देण्यात येईल.

 

दरम्यान त्याप्रसंगी हातकणंगले तालुका युवा अध्यक्ष सलमान नाईकवाडे,तालुका निरीक्षक दाऊद मुल्लाणी,तालुका उपाध्यक्ष मोहसीन हकीम ,रेंदाळ शहर अध्यक्ष सद्दाम हकीम, शहर उपाध्यक्ष मोहीद्दीन मुजावर,शहर कार्याध्यक्ष तौफीक जमादार,सदस्य बालेचाँद मुजावर,आयुब हकीम,समीर हकीम,रमजान जमादार,अमीन तहसीलदार,सुहेल हकीम,आरमान जमादार,शब्बीर हकीम,बाळासो हकीम आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *