Share Now
Read Time:1 Minute, 12 Second
विशेष प्रतिनिधी : सुलोचना नार्वेकर
कोल्हापूर : वलीवडे (ता. करवीर) येथील अल्पवयीन मुलीला काहीतरी आमिष दाखवून पळवून नेल्याबद्दल पंकज राजेंद्र कांबळे (मुळ रा. येवती, ता. करवीर, सध्या रा. माळवाडी वळीवडे) या तरुणावर गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबतची फिर्याद पीडित मुलीच्या वडिलांनी दिली आहे. त्यात म्हटले आहे की , पीडित मुलगी बाजार आणण्यास गेली होती. ती परत घरी आली नाही म्हणून नातेवाइकांनी चौकशी केली असता , पंकज कांबळेने तिला काही तरी आमिष दाखवले व तिला त्याने मोटरसायकल ( एम एच ०९ – ई वाय ०७३४) वरून पळवून नेल्याचे समजले. याबाबत पंकज कांबळे याच्यावर गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मलमे करत आहेत.
Share Now