मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क
सरपंच सेवा संघातर्फे या वर्षाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामधील उल्लेखनीय लेखणी करणारे संपादक व पत्रकार यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
पुरस्कारांसाठी पत्रकारांची मागील 5 वर्षाची कामगिरी, त्यांची सामाजिक बांधिलकी, शासनाच्या विकासविषयक प्रसिध्दीसाठी, जनतेमधील विकासविषयक जाणिवांच्या जागृतीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि पुरस्कार देण्यात येणाऱ्या वर्षातील त्यांची कामगिरी याचा विचार केला जातो.
यामध्ये संपादक श्री. दिलीप जगताप,( दै.किर्तिवंन्त )
संपादक श्री. सुरेश माडकर (दै. जनमत), संपादक श्री. शिवाजी शिंगे, ( मिडिया कंट्रोल)श्री. धनाजी गुरव (दै. पुढारी), श्री. दिपक मेटील (दै. लोकमत) श्री. महेश गावडे (दै. सकाळ), श्री. विक्रम पाटील (दै. लोकमत), श्री. कृष्णात जमदाडे (एस.पी.एन न्यूज), संपादक श्री. उत्तम कागले (हिंदूसम्राट), अनिल पाटील (मुक्त पत्रकार)पेठवडगाव , राजू चौगुले (दै.स्वातंत्र्य प्रगती), सागर धुंदरे (दै. पुण्यनगरी), अनिल पाटील (इंडिया स्टिंग), विक्रम धनवडे (मुक्त पत्रकार)भादोले, सुहास शिंदे (जनमत) आदी संपादक /पत्रकारांचा सत्कार करण्यात येणार आहे.
यासाठी सरपंच सेवा संघाचे पुणे विभाग समन्वयक सुरेश राठोड (पत्रकार), जिल्हा समन्वयक भगवान पाटील, जिल्हाध्यक्ष सरपंच महादेव पाटील यांचे सहकार्य लाभले. पत्रकार हे पत्रकारितेच्या या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करत निस्वार्थ भावनेतून समाजाची सेवा करत राज्यभरातील विविध भागात कायम कार्यरत असतात. ग्रामविकासात भरीव कामगिरी करणाऱ्या स्वयंसेवी, राजकीय नेते मंडळी, सामाजिक कार्यकर्ते यांच्या कार्याचा आढावा घेऊन यांना प्रसिद्धी माध्यमातून योगदान देतात याबद्दल सरपंच सेवा संघ सर्वांचा आभारी आहे व अशीच आपली भरभराट होवो. सदर आपले काम प्रेरणादायी व दिपस्तंभासमान आहे अशी माहिती सरपंच सेवा संघाचे सरचिटणीस बाबासाहेब पावसे पाटील यांनी पत्राद्वारे दिली.
सर्व पत्रकारांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
या पूरस्काराचे वितरण ऑक्टोंबर महीण्यात “शिर्ङी ” येथे होणाऱ्या एका शानदार समारंभात मान्यवरांच्या हस्ते प्रधान करण्यात येणार आहे