प्रतिनिधी : सतिष चव्हाण
कोल्हापूर, ता. २३ – गुजरी परिसरात हरवलेली सोन्याची लगड प्रामाणिकपणे परत करणारा बंगाली कारागीर प्रसन्नजित शंकर दासचा आज सराफ व्यापारी संघात अध्यक्ष कुलदीप गायकवाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी – शिवाजी पेठ येथील सराफ व्यावसायिक सागर अशोक नलवडे यांची सुमारे ५ तोळे सोन्याची लगड आटणी काढून झाल्यानंतर कासार गल्ली परिसरात १६ ऑगस्ट २०२० रोजी गहाळ झाली होती. त्यावेळी त्यांनी तत्काळ अध्यक्ष कुलदीप गायकवाड यांच्याशी संपर्क साधून स्थानिक सराफ कारागीर, व्यावसायिकांना याची माहिती दिली. दरम्यान, स्थानिक बंगाली कारागीर प्रसन्नजित शंकर दास याला ती सापडली. त्याने लगडसंबंधीची माहिती कुलदीप गायकवाड व बंगाली कारागीर संस्थेचे अध्यक्ष बिश्वजित प्रामाणिक यांना दिली. आज सागर नलवडे यांना ती लगड प्रामाणिकपणे परत केली. यावेळी प्रसन्नजित याचा शाल, श्रीफळ व बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष कुलदीप गायकवाड, उपाध्यक्ष जितेंद्र राठोड, सचिव अनिल पोतदार, संचालक प्रीतम ओसवाल, सभासद शीतल पोतदार, बंगाली कारागीर संस्थेचे अध्यक्ष बिश्वजित प्रामाणिक, उपाध्यक्ष इंद्रजित सामंत, सचिव बनीशंकर दुराई, संचालक राजकुमार दुराई, देबासीस देडिया, बापी भोवी, संदीप मंडल आदी उपस्थित होते.