महानगरपालिका कर्मचारी सांस्कृतिक मंडळाची गणेश मुर्ती पर्यावरण पूरक विसर्जित

कोल्हापूर. दिनेश चोरगे :कोल्हापूर महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचारी यांची महानगरपालिका कर्मचारी सांस्कृतिक मंडळाची स्थापना सन १९९५ मध्ये कामगार नेते कै.रमेश देसाई यांनी केली होती.

प्रतिवर्षी गणेश उत्सव मोठया प्रमाणात साजरा केला जात होता. परंतू यावर्षी संपूर्ण जगावर कोरोनाचे सावट असल्यामुळे व कोरोनाचा सामूहिक संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाच्यावतीने सर्व सार्वजनिक मंडळांना पर्यावरण पूरक व गर्दी टाळून साध्या पध्दतीने साजरा करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनास प्रतिसाद देत आज कोल्हापूर महानगरपालिका सांस्कृतिक मंडळाने दरवर्षी अंनत चतुर्थीला करणारे विसर्जन यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिड दिवसामध्ये विसर्जन करण्याचा निर्णय घेतला होता.
त्याप्रमाणे आज गणेश मुर्तीचे विसर्जन महापौर सौ.निलोफर आजरेकर, आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी व विरोधी पक्षनेते विजय सुर्यवंशी यांच्याहस्ते मुर्तीची मनोभावे पूजा करुन महापालिकेच्या चौकात पर्यावरण पूरक गणपती विसर्जन कुंडामध्ये विसर्जन करण्यात आले.

Advertisements

यावेळी महापौर सौ.निलोफर आजरेकर यांनी बाप्पांच्याकडे जगावरील कोरोनाचे सावट लवकर हटू दे व कोल्हापूर शहराचे आरोग्य निरोगीमय होऊ दे , अशी प्रार्थना केली. त्याचप्रमाणे कोल्हापूर शहरवासीयांनी गणेश आगमनाचे प्रसंगी अत्यंत संयमाने व गर्दी न होऊ देता आपल्या बाप्पाची आगमन करुन प्रतिष्ठापणा केली. याबद्दल महापौर यांनी शहरावासीयांप्रती आभार व्यक्त केले.

आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी घरगुती गणपती विसर्जनासाठी प्रशासनाच्यावतीने शहरात विविध ठिकाणी गणेश विसर्जन कुंड ठेवण्यात आले आहेत. त्यामध्ये मुर्तीचे विसर्जन करण्यात यावे व निर्माल्य स्वतंत्ररित्या संकलीत करण्यात यावेत, यासाठी प्रशासनाच्यावतीने प्रत्येक प्रभागामध्ये स्वतंत्र व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे. त्याचा लाभ सर्व शहरवासियांनी घ्यावा, असे आवाहन आयुक्तांनी यावेळी केले.

विरोधी पक्षनेते विजय सुर्यवंशी यांनी महानगरपालिका कर्मचारी सांस्कृतिक मंडळाने अत्यंत साध्या पध्दतीने व प्रशासनाच्या भूमिकेच्या दिशेने एक पाऊन उचलून चांगला उपक्रम घेतला, याबद्दल सर्व कर्मचारी यांचे विशेष कौतुक केले.
 यावेळी सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष विजय वणकुद्रे, कामगार अधिकारी सुधाकर चल्लावाड, रवि पोवार, प्रदीप व्हरांबळे, सागर सांरग, महेश काडवे, शिवाजी लिगाडे, अक्षय आदमाने, देवानंद कांबळे, दादाभाऊ साबळे, रावजी कुऱ्हाडे, अमोल भेडसगांवकर, आण्णा भालकर, बंडोपंत साळोंखे, विक्रम सुर्यवंशी आदी कर्मचारी उपस्थित होते.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *