सांगली प्रतिनिधी : शरद गाडे
सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका,
गॅस दाहिनी चे सुस्वागतम चा बोर्ड लावून उद्घाटन धुमधडाक्यात केले. विद्युत पुरवठा खंडित झाल्यावर गॅस दाहिनी बंद पडते. गॅस दाहिनीला कोणत्याही प्रकारचा विद्युत पुरवठा करणारा बॅकअप (जनरेटर) महापालिकेकडून बसवण्यात आलेला नाही. विद्युत पुरवठा खंडित झाल्यानंतर दोन ते तीन तास लोकांना ताटकळत राहावे लागते. शुक्रवार दिनांक 21 ऑगस्ट रोजी सांगली स्मशानभूमी येथे गॅस दाहिनी बंद होती त्याच बरोबर लाकडावर विधी करण्यासाठी महापालिकेचा कुपवाड येथे कोणीही व्यक्ती हजर नव्हता. त्यामुळे लोकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाली.
देशात स्वच्छ सर्वेक्षण मध्ये 36 वा व राज्यात 9 वा क्रमांक आला म्हणून आपण स्वतःची पाठ थोपटून घेतोय माणसाच्या शेवटच्या अंत्यविधी वेळी योग्य उपाययोजना करण्यास कुचकामी ठरत असताना मोठ्या मोठ्या गोष्टी करणे अतिशय लाजिरवाणी आहे. गॅस दाहिनी चा विद्युत पुरवठा खंडित झाल्यावर ताबडतोब जनरेटरची सोय करण्यात यावी व लोकांच्या भावनेशी खेळण्याचा प्रकार ताबडतोब थांबवावा. व असा प्रकार पुन्हा घडल्यास मा. मदन भाऊ पाटील युवा मंच सांगली जिल्हा यांच्याकडून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा मा. मदन भाऊ पाटील युवा मंचचे जिल्हाध्यक्ष आनंदा लेंगरे यांनी दिला आहे.