विशेष प्रतिनिधी : सुलोचना नार्वेकर
कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपुर्ण जनजीवन विस्कळित झालं आहे. अनेक उद्योगधंदे मंदावले असल्याने याचा परिणाम गणेशोत्सवावर झाला आहे. म्हणून प्रशासनाने एक गाव एक गणपती ही संकल्पना मांडली होती.
प्रशासनाच्या संकल्पनेला प्रतिसाद देत चिंचवाड मध्ये एक गाव एक गणपती ही संकल्पना प्रत्यक्षात साकार झाली आहे.
चिंचवाड मध्ये सर्व तरूण मंडळे,तालीम मंडळे, मिळून व गावातील ग्रामस्थ, गावचे सरपंच,उपसरपंच, ग्रा. वि. अधिकारी पोलिस पाटील, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामपंचायत कर्मचारी या सर्वांनी मिळून कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत असल्यामुळे चिंचवाड मध्ये एक गाव एक गणपती बसवण्याचा निर्णय घेतला त्यामध्ये गांधीनगर पोलीस ठाण्याचे प्रमुख दिपक भांडवलकर यांचे अत्यंत महत्त्वाचे सहकार्य लाभले.
दिपक भांडवलकर यांनी प्रत्येक गावामध्ये जाऊन एक गाव एक गणपती चा नारा केला व त्याला चिंचवाड गावांने साथ देऊन आज चिंचवाड मध्ये एक गाव एक गणपती बसवण्यात आला आहे.