गुन्हे अन्वेषण पथकाची कारवाई : गावठी पिस्तुल, काडतुसे असा एकूण १ लाख २६ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:3 Minute, 10 Second

सांगली प्रतिनिधी तुकाराम कदम : सांगली पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा व अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले यांनी जबरी चोरी, घरफोडी व अवैद्य शस्त्रे बाळगणार्‍या गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचा आदेश दिला होता.

त्यानुसार सांगली पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी ही कामगिरी गुन्हे अन्वेषण पथकाकडे सोपवली.
गुन्हे अन्वेषण पथकाने (गुरुवारी) ३ सप्टेंबर रोजी तपास करत असताना देशी बनावटीचे एक पिस्तूल, एक जिवंत काडतुस व एक कुकरी स्वतःजवळ बाळगणार्‍या १) दशरथ पांडुरंग माळी ( वय २६, रा. रोपळे बुद्रुक ता. पंढरपूर जि. सोलापूर) आणि २) शिवकुमार किशोर शिंदे (वय २६, रा. रोपळे बुद्रुक ता. पंढरपूर, जि. सोलापूर ) या दोघांना ताब्यात घेऊन गुन्हे अन्वेषण पथकाने त्यांच्यावर कारवाई केली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे अन्वेषण पथकातील सचिन कनप यांना शिरढोण येथील साई गणेश पान शॉप जवळ दशरथ पांडुरंग माळी व शिव कुमार किशोर शिंदे हे दोघे अवैद्य शस्त्र बाळगत मोटर सायकल वरून येऊन थांबले असल्याची माहिती मिळाली. त्यांची झडती घेतली असता  दशरथ माळी याच्या कमरेला एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतुस आणि शिवकुमार शिंदे याच्या कमरेला एक कुकरी असल्याचे निदर्शनास आले. तसेच गुन्ह्यात वापरण्यात येणारी मोटरसायकल असा एकूण १,२६,२०० रुपये किमतीचा मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त करण्यात आला.


तसेच पोलीस उपनिरीक्षक प्रदीप चौधरी यांनी हा मुद्देमाल जप्त करून त्यांच्याविरुद्ध कवठेमहाकाळ पोलीस ठाण्यात ॲक्ट ३,४,२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात करण्यात आला.

 ही कारवाई पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रदीप चौधरी, पोलीस उपनिरीक्षक शरद माळी , सचिन कुंभार , सचिन कनप , मच्छिंद्र बेर्डे , मुदस्सर पाथरवट , संजय पाटील , राजाराम मुळे, सुनील लोखंडे ,आमसिद्ध खोत,अजय बेंदरे, उर्मिला खोत निसार मुलाणी यांनी पार पाडली

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *