Getting your Trinity Audio player ready...
|
विशेष प्रतिनिधी : अभिजीत निर्मळे
सांगली : पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा व अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले यांनी सांगली व मिरज विभागात रात्रीच्यावेळी रोडवर वाहनांना अडवून मोबाईल व पैसे चोरणाऱ्या आरोपींचा शोध घेऊन कारवाई करण्याच्या सूचना गुन्हे अन्वेषण पथकाला दिल्या.
त्याप्रमाणे मंगळवारी ८ सप्टेंबर रोजी गुन्हे अन्वेषण पथकातील अधिकारी व कर्मचारी चौकशी करत असताना महात्मा गांधी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मिरज शास्त्री चौक ते घाट रस्ताकडे जाणाऱ्या रोड ला रात्रीच्या वेळी अडवून मोबाईल पैसे व चोरी या गुन्ह्याचे अनुषंगाने जुन्या रेकॉर्डवरील आरोपीची माहिती घेत सांगली भागात पेट्रोलिंग करीत असताना सचिन कनप व आमसिद्धा खोत यांना खास बातमीदाराकडून माहिती मिळाली की, इंदिरानगर झोपडपट्टी आंबेडकर कट्ट्याजवळ एक व्यक्ती स्वस्त दरात कागदपत्रे नसलेला विवो या कंपनीचा मोबाईल विक्री करण्यासाठी आला असल्याची माहिती दिली.
त्यानुसार गुन्हे अन्वेषण पथकाने रवि सुरेश ऐवळे (वय २३, रा. इंदिरानगर झोपडपट्टी,सांगली) याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ विवो कंपनीचा मोबाईल मिळाला, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप चौधरी यांनी त्याच्याकडे चौकशी केली परंतु तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला त्यावेळी खास विश्वासात घेऊन चौकशी करता त्याने मी व माझ्या साथीदाराने मिळून सात -आठ दिवसापूर्वी मिरज शास्त्री चौक ते घाट रस्त्याकडे जाणाऱ्या रोडवर एका
चार -चाकी गाडीस आडवत त्याला चाकूचा धाक दाखवून त्याचा मोबाइल व त्यांच्याकडील रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतल्याची कबुली दिली .
त्यावेळी महात्मा गांधी पोलीस ठाणे येथे विचारणा केली असता, गुरनं १५८/२०२० भादविस कलम ३९४, ५०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल असून , ह्या गुन्ह्यांमध्ये रोख रक्कम १२००० व सॅमसंग व विवो कंपनीचे २ मोबाईल चोरीस गेल्याचे समजले .
त्या वेळी पोलीस उपनिरीक्षक प्रदीप चौधरी यांनी रवी सुरेश ऐवळे याच्याकडील विवो कंपनीचा पंधरा हजार रुपयांचा मोबाईल जप्त केला. व त्याच्याकडे दुसऱ्या सॅमसंग मोबाईल व रोख रक्कम याबद्दल विचारता, त्याने तो मोबाइल व रोख रक्कम माझ्या साथीदाराकडे असल्याचे सांगितले.
रवी ऐवळे यास पुढील तपासकामी महात्मा गांधी पोलीस ठाण्याकडे मुद्देमालासह वर्ग करण्यात आले, असून त्याच्याकडे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ही कारवाई पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली , पोलीस उपनिरीक्षक प्रदीप चौधरी , अमित परीट, संजय पाटील ,आमसिद्ध खोत, सचिन कनप , मुदतसर पाथरवट , सुधीर गोरे , शशिकांत जाधव , अजय बेंद्रे , विकास भोसले , सुनील लोखंडे ,महादेव धुमाळ , संजय कांबळे , सागर लवटे , ज्योती चव्हाण , सायबर पोलिस संदीप पाटील , कॅप्टन गुंडवाडे, सूनील मदने , स्वप्नील नायकवडे यांनी पार पाडली.