विशेष प्रतिनिधी : शरद गाडे
सांगली : कोरोना पॉझिटिव्ह मृतदेहाची हेळसांड ताबडतोब थांबवा पॉझिटिव्ह मृतदेह दहा-पंधरा तास कोणती विधी न करता तसेच पडून आहेत. मृतदेहाची हेळसांड व नातेवाईकांच्या भावनेशी होणारा खेळ प्रशासनाने ताबडतोब थांबवावा अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल .असा इशारा मदन भाऊ युवा मंचच्या वतीने देण्यात आला.
मनपा कर्मचारी ग्रामीण भागातील पॉझिटिव्ह मृतदेहावर दहन विधी करण्यास तयार नाहीत व ग्रामीण भागात पॉझिटिव्ह मृत व्यक्तीवर विधी करण्याची प्रशासनाने कोणतीही यंत्रणा उपलब्ध केली नाही, अशा परिस्थितीत नातेवाईकांनी कोणता निर्णय घ्यायचा, हा मोठा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. पालकमंत्री ,आमदार ,खासदार ,आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी एकत्र येऊन त्याच्यावर ताबडतोब तोडगा काढावा अन्यथा मृत पॉझिटिव्ह व्यक्तीवर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विधी केला जाईल , याची नोंद घ्यावी.
तसेच लोकांच्या भावनेचा खेळ थांबवून ताबडतोब निर्णय घ्यावा, अशी वेळ परत आल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल, असे मदन भाऊ पाटील युवा मंच सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष आनंद लेंगरे यांनी पत्रकाद्वारे आवाहन केले आहे.