Getting your Trinity Audio player ready...
|
सांगली प्रतिनिधी शरद गाडे : प्रशासन रोज ऑक्सीजन बेड व व्हेंटिलेटर उपलब्ध असणारी माहिती प्रसिद्ध करते पण खालील जागेवरती प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, कुठेही ऑक्सीजन बेड व व्हेंटिलेटर उपलब्ध होत नाहीत.
कोव्हीड-१९ सेंटर व प्रशासन यांच्यात समन्वयाचा अभाव जाणवत आहे.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार रुग्ण व नातेवाईक यांनी कोव्हीड सेंटरला जाऊन चौकशी केली असता,व्हेंटिलेटर उपलब्ध नाहीत. अशी माहिती दिली जाते यातून रुग्णांचा व नातेवाईकांचा वेळ जाऊन मानसिक खच्चीकरण होते. तसेच प्रशासनाने दिलेल्या चुकीच्या माहितीचा पाठपुरावा करेपर्यंत रुग्ण दगावण्याची दाट शक्यता आहे व दगावले ही असतील?
या आणीबाणीच्या काळात प्रशासनाकडून ऑक्सीजन बेड व व्हेंटिलेटर कुठे उपलब्ध आहेत याची अचूक माहिती मिळणे अत्यंत गरजेचे आहे. तसे न होता प्रशासनाकडून मिळणारी माहिती व कोव्हीड-१९ सेंटरची वस्तुस्थिती पाहता कुठेही कोव्हीड १९ सेंटर व प्रशासन यांचा ताळमेळ घालून अचूक माहिती जनतेपर्यंत पोहोचावी जेणेकरून रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची होणारे हेळसांड थांबेल. तसेच अचूक माहिती देण्याबाबतची संबंधित अधिकाऱ्यांना आदेश द्यावेत, असे निवेदन मा.जिल्हाधिकार्यांना मा. मदन भाऊ पाटील युवा मंच जिल्हा सांगली यांच्याकडून देण्यात आले आहे.