खाजगी डॉक्टरांनो, नुसत्या नोटाच छापू नका; माणुसकीचा ओलावाही जिवंत ठेवा : मंत्री मुश्रीफ

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:4 Minute, 25 Second

कोल्हापूर प्रतिनिधी सतीश चव्हाण : खाजगी डॉक्टरांनो, कोरोना उपचाराच्या नावाखाली नुसत्या नोटाच छापू नका. माणुसकीचा ओलावाही जिवंत ठेवा, असे भावनिक आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. आगतिक कोरोनाबाधित रुग्णांचा  केवळ गैरफायदा न घेता, समाजाची सेवाही करा, असेही ते म्हणाले.  
             
कागलमध्ये नामदार हसन मुश्रीफ फाऊंडेशन व खासगी डॉक्टर डॉ. अमर पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृहातील कोविड हॉस्पिटलच्या उद्घाटन कार्यक्रमात श्री. मुश्रीफ बोलत होते.
यावेळी नगरसेवक प्रवीण काळबर यांनी सुरु केलेल्या रुग्णवाहिकेचाही शुभारंभ झाला. तसेच कोरोनातून बरे झालेल्या कागल मधील हिंदुराव परसू पसारे (वय-७५) व त्यांच्या पत्नी सौ सुलोचना हिंदुराव पसारे (वय-७०)या जोडप्याच्या हस्ते मंत्री मुश्रीफ यांचा सत्कार झाला.  
               
भाषणात मंत्री श्री.मुश्रीफ पुढे म्हणाले, या पद्धतीने सुरू केलेले महाराष्ट्रातील हे पहिले आणि एकमेव कोविड हॉस्पिटल आहे. ११२ बेडच्या या हॉस्पिटलमधून अलगीकरणसह ऑक्सिजन व व्हेटीलेटर या सुविधाही अत्यल्प दरात दिल्या जाणार आहेत.
            
ते पुढे म्हणाले, ‘माझं कुटुंब -माझी जबाबदारी’ हे अभियान प्रभावीपणे राबवूया, घराघरात ताप आणि ऑक्सिजनची तपासणी करून जे संभाव्य रुग्ण असतील त्यांची टेस्ट करून त्यांच्यावर तातडीने उपचार करूया. १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर हा या योजनेचा पहिला टप्पा असेल. १२ ते २४ ऑक्टोबर हा या योजनेचा दुसरा टप्पा असेल आणि २५ ऑक्टोबरला कोरोनारुपी राक्षसाचा वध करण्याचा निर्धार करुया, असे ते पुढे म्हणाले.

या तालुका आढावा बैठकीला प्रांताधिकारी रामहरी भोसले, तहसीलदार शिल्पा ठोकडे, गटविकास अधिकारी शबाना मोकाशी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनिता पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्रेयस जुवेकर, कागलचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय नाळे, मुरगूड सहाय्यक पोलिस निरीक्षक सौ. विद्या जाधव, जिल्हा बॅंक संचालक भैया माने, माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर, रमेश माळी, कागल नगरपालिकेचे मुख्याधिकारी पंडीत पाटील, मुरगूडचे मुख्याधिकारी संजय गायकवाड, आरोग्य निरीक्षक अभिजीत गोरे, प्रवीण काळबर, विवेक लोटे, ॲड. संग्राम गुरव आदी उपस्थित होते. उपनगराध्यक्ष सौरभ पाटील यांनी आभार मानले. 

हातात हात घालून काम करूया…..

 विरोधक समरजितसिंह घाटगे यांचे नाव न घेता श्री मुश्रीफ म्हणाले, ज्यांचा कारखाना साखर कारखाना आहे. आवश्यक साधन सामग्रीही तयार आहे. त्यांनीही एखादे कोविड सेंटर सुरू करावे. जनतेच्या सेवेसाठी हातात हात घालून काम करूया. या संदर्भातील त्यांच्याशी चर्चेलाही मी तयार आहे. अशा महाभयानक संकट काळात जनतेच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे, हे आम्हा सर्वांचे आद्यकर्तव्य आहे.

 

 

 

 

 

 

 

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *