शासनाच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेलवर पोलीस दलातर्फे दंडात्मक कारवाई

प्रतिनिधी : जावेद देवडी

शासनाच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल्स व्यवसायिक व खाद्यपदार्थ व्यापार्यांच्यावर पोलीस दलातर्फे दंडात्मक कारवाई

Advertisements

जगभरामध्ये व देशामधे covid-19 उर्फ कोरोना या संसर्गजन्य आजाराने थैमान घातले असून कोल्हापूर जिल्ह्यात देखील बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे.

सध्या लॉक डाऊन चा कालावधी संपला असून त्यांच्या अटी शर्ती हळू हळू शिथिल करण्यात येत आहेत. परंतु नागरिकांमध्ये जनजागृतीचा अभाव असल्याने अथवा टाळता न येण्याजोग्या परिस्थितीमध्ये नागरिक घराबाहेर पडून बाजारपेठांमध्ये, दुकानांमध्ये, सरकारी कार्यालये या ठिकाणी गर्दी करत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आलेले आहे.

मा. जिल्हाधिकारी सो, कोल्हापूर तसेच माननीय पोलीस अधीक्षक सो कोल्हापूर यांनी सदरची परिस्थिती विचारात घेऊन त्यावर प्रतिबंधक उपाय योजना म्हणून काही प्रतिबंधात्मक आदेश जिल्हाभर लागू केलेले आहेत. त्यामध्ये आस्थापनांच्या उघडण्याच्या बंद होण्याच्या वेळा निश्चित केल्या आहेत,

सोशल डिस्टंसिंग बाबत नियम केले आहेत तसेच घराबाहेर कुठल्याही कारणास्तव वावरताना फेस मास्क वापरणे अनिवार्य करण्यात आलेले आहे.
या बंधनांचे काटेकोर पालन न केल्यास दंडात्मक कारवाईची देखील त्यामध्ये योजना करण्यात आलेली आहे.

मा. जिल्हाधिकारी सो यांच्या आदेशान्वये प्रतिबंधक कारवाईची अंमलबजावणी करण्याकरता महानगरपालिका कोल्हापूर शहर, स्थानिक स्वराज्य संस्था व जिल्हा पोलीस दल हे संयुक्तरीत्या तसेच स्वतंत्ररित्या देखील प्रयत्न करत असून नागरिकांचे प्रबोधन करणे, त्यांना समज देणे तसेच जाणीवपूर्वक नियमांचे व शासनाच्या आदेशांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणे इत्यादी उपाययोजना अवलंबल्या जात आहेत.

कोल्हापुर जिल्हा पोलीस दलातर्फे कोल्हापूर शहरामध्ये तसेच जिल्ह्यामध्ये मास्क न घालणारे, सोशल डिस्टंसिंग न पाळणारे नागरिक, विहित वेळेपेक्षा जास्त वेळ आस्थापना चालू ठेवून गर्दीस कारणीभूत असणारे बाजारपेठांमध्ये हॉटेलस, खाद्यपदार्थविक्री करणारे दुकानदार, व्यापार्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली खालील प्रमाणे.

दिनांक 11 सप्टेंबर 220 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील इत्यादिंच्यावर कारवाई करण्यात आली.

1) मास्क न घालता सार्वजनिक ठिकाणी वावरणे :- 1020 नागरिकांच्या कडून

2) विहित वेळेपेक्षा अस्थापना चालू ठेवणे :- 30 व्यापाऱ्यांच्यावर

3) आस्थापनांमध्ये सोशल डिस्टंसिंग चे उल्लंघन करणे :- 18 व्यवस्थापकांच्यावर

एकूण दंडात्मक रकमेची वसुली :- 1,28,250 /- रुपये

त्याप्रमाणे सोशल डिस्टंसिंग च्या नियमांचा भंग करून हॉटेलमध्ये एकत्रित एका टेबलवर जेवण करण्यास बसू देणारे हॉटेल व्यवसायिक व व्यापारी यांचेवर दंडात्मक कारवाई केली आहे.

व्यापाऱ्यांनी शासनाच्या आदेशाची गंभीरता न घेटल्यास दंडात्मक कारवाईची तिव्रता
दिवसेदिवस वाढ करण्यात येणार आहे. असे पोलीस दलातर्फे कळविण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *