बांधकाम कामगारांच्या मागण्यासंदर्भात पनवलकरांना निवेदन

राधानगरी प्रतिनिधी अतुल पाटील : पुणे विभाग अप्पर कामगार उपायुक्त मा. पनवलकर यांना बांधकाम कामगारांच्या विविध प्रकारच्या मागण्यासाठी निवेदन देण्यात आले.

या निवेदनात लॉकडाऊन च्या काळात कामगारांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. विविध प्रकारच्या योजनेचे अर्ज भरून दोन वर्ष होत आहे. त्यातच ऑनलाईन चा विषय करून हे मागील लाभ वाटायला विलंब करत आहेत. तपासून निकाली काढलेले अर्ज ते पुन्हा ऑनलाईन ला मंडळ टाकत असून त्यामुळे कामगारांच्यात मोठ्या प्रमाणात कामगार मंडळाविषयी नाराजी आहे. हक्काचा लाभ, नोंदीत, नूतनीकरण यास विलंब यामुळे कामगार पूर्णपणे असंमज स्थिती मध्ये आहे. तसेच मंडळाकडे कोट्यावधी रुपये असून मंडळाने कामगारांच्या मुलांसाठी लॅपटॉप, सायकल द्यावी तसेच कामगारां च्या मुली साठी लग्न कार्यास ५१ हजार रुपये मदत करावी . असे निवेदनात म्हटले आहे.
त्यावेळी अप्पर कामगार आयुक्त पुणे यांनी मी स्वतः लक्ष घालून निर्णय घेतो असे आश्वासन दिले. तसेच सांगली व कोल्हापूर जिल्हा कामावर सहाय्यक आयुक्त अनिल गुरव हे कामगारांसाठी सतत पाठपुरावा करत आहेत. पण कामगार मंडळ त्यांनाही सहकार्य करत नाही असे यावेळी बोलण्यात आले.
हे निवेदन देताना कामगार नेते अमितदादा कदम, बहुजन नेते संदीप पाटोळे, प्रवीण कांबळे उपस्थित होते.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *