मदन कृष्णराव पाटील यांच्याकडून २ हजार मास्क, २ हजार हॅन्डग्लोज कोव्हिड सेंटरला सुपूर्द

कोल्हापूर प्रतिनिधी रवी जगताप : शहरातील कोव्हीड केअर सेंटर्समधील रुग्णांसाठी मदत करण्याच्या महापौर सौ.निलोफर आजरेकर, आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या आवाहनास दानदुरांकडून उर्त्स्फुत प्रतिसाद मिळू लागला आहे.
आज कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे संघटक सचिव मदन कृष्णराव पाटील यांनी २ हजार मास्क, २ हजार हॅन्डग्लोज महानगरपालिकेकडे सुपूर्द केले.

तसेच संघटक सचिव मदन कृष्णराव पाटील यांनी महासैनिक दरबार हॉल येथील कोव्हिड केअर सेंटरमधील रुग्णांसाठी ६०० हॅन्डग्लोजही आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या उपस्थितीत आज दिले.

Advertisements

 शहरातील कोव्हीड केअर सेंटरमधील रुग्णांना फळे, सॅनिटाईजर, हॅण्डग्लोज, मास्क, नारळ पाणी अशा बाबी यापुढील काळातही उपलब्ध करुन देण्यात दानशुर व्यक्ती आणि संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *